नवाब मलिकांच्या अडचणी संपेनात! जामिनावरील निकाल ठेवला राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 08:33 AM2023-06-17T08:33:36+5:302023-06-17T08:33:50+5:30

दाऊदशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

No Relief to Nawab Malik problems as Judgment on bail reserved | नवाब मलिकांच्या अडचणी संपेनात! जामिनावरील निकाल ठेवला राखून

नवाब मलिकांच्या अडचणी संपेनात! जामिनावरील निकाल ठेवला राखून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. शुक्रवारी मलिक व ईडीचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्या. प्रभुदेसाई यांनी जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला. ६५ वर्षीय मलिक यांनी आपण किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याने आपली तात्काळ वैद्यकीय जामिनावर सुटका करावी, अशी विनंती न्यायालयाला केली. मलिक  गेल्या वर्षीपासून रुग्णालयात  उपचार घेत आहेत. त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तिवाद मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी केला. त्यावर ईडीने आक्षेप घेतला होता.

Web Title: No Relief to Nawab Malik problems as Judgment on bail reserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.