ज्या नोकराकडे घराच्या देखरेखीसाठी चावी दिली, तोच घरातील ५ कोटींचा माल घेऊन झाला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 01:01 PM2021-07-10T13:01:43+5:302021-07-10T13:03:22+5:30
पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून सध्या ३० लाख ताब्यात घेतले आहेत.
नोएडामध्ये एका मालकाने ज्या नोकराला घर सांभाळण्यासाठी ठेवलं होतं त्यानेच पूर्ण घर साफ केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद मालकाने नोएडामधील त्याचं घर आपल्या नोकराकडे देखरेखीसाठी दिलं होतं. या नोकराने त्याच्या काही साथीदारांसोबत मिळून मालकाच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि कारसहीत ५ कोटीचा माल लंपास केला. पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून सध्या ३० लाख ताब्यात घेतले आहेत.
नोएडाचे एडिशनल डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, '२ मे रोजी रामू थापेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं होतं की, त्याचे मालक पीयूष बन्दोपाध्याय जो फसवणुकीच्या केसमध्ये दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्यांनी आपल्या घराची देखरेखची जबाबदारी त्यांचा ड्रायव्हर गयादीन उर्फ गोपालकडे दिली होती'.
मालक तुरूंगात गेल्यावर काही दिवसातच ड्रायव्हर गोपालने साथीदारांसोबत मिळून पीयूषच्या घरातून सियाज कार, एक स्कूटी, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, आवश्यक कागदपत्रे, २ फ्रीज, २ टीव्ही, सोफा, कारपेट, वॉशिंग मशीन, अनेक एसी आणि इतरही काही वस्तू ट्रकमद्ये भरून फरार झाला. चोरांनी घरात एकही वस्तू ठेवली नाही. चोरी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ५ कोटी रूपये आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे'. (हे पण वाचा : ‘फोन पे’च्या ऑफरची बतावणी करून दाम्पत्याची आर्थिक फसवणूक)
डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी नोकर गोपाल याला अटक केली आहे. गोपालची चौकशी केल्यावर पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांनाही मध्यप्रदेशमधून अटक केली. ज्या घरात चोरीची घटना घडली त्या घराचा मालक पीयूष इन्नोवेटिव आयडियाज नावाने कंपनी चालवत होता आणि परदेशी कंपन्यांना टेक्निकल सपोर्ट अॅडव्हाइस देत होता.
पीयूषला फसवणुकीच्या केसमध्ये २८ ऑगस्ट २०२० मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक करत तिहार तुरूंगात पाठवलं होतं. तुरूंगात जातेवेळी त्याच्या घराची चावी देखरेखीसाठी ड्रायव्हर गयादीन उर्फ गोपालकडे दिली होती. तो सर्व सामानाची देखरेख करत होता. या चोरांकडून ३० लाख रूपये मिळाले आहेत. चाडेचार कोटी मिळणे बाकी आहे.