फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:33 PM2023-03-20T18:33:46+5:302023-03-20T18:34:40+5:30

दोन वर्षापूर्वी एका तरुणीची फेसबुकवरुन तरुणासोबत मैत्री होते, हळूहळू त्या दोघांच बोलण वाढतं.

noida girl sexual assault by facebook friend in gurugram | फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

googlenewsNext

दोन वर्षापूर्वी एका तरुणीची फेसबुकवरुन तरुणासोबत मैत्री होते, हळूहळू त्या दोघांच बोलण वाढतं. यात त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. दिवसभरातील जास्त वेळ दोघ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. तरुणीचा त्या तरुणावर जास्त विश्वास वाढतो. या विश्वासाचा तरुणाने गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या प्रकरणी तरुणीने पोलीस (police) ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन वर्षांपूर्वी तरुणीची गौरव कश्यपसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. काही महिन्यांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी गौरवने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. गौरव आधीच विवाहित असल्याचे नंतर समोर आले आहे. यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले.

पती अनैतिक संबंधात ठरला अडसर, नशेची गोळी चारली, प्रियकराला घरी बोलावलं अन् ...

१६ मार्च रोजी गौरवने तिला कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने गुरुग्रामला बोलावले. गौरवने तिला कारमध्ये बसवून इफको चौकाजवळील जीएसटी कार्यालयात नेले, तेथून त्याने त्याचा मित्र रजत याला फोन केला. त्याने तरुणीला सांगितले की, रजत हा वकिलाकडे काम करतो. त्याने मुलीला मित्रासह पीजीमध्ये पाठवले.
 
रजत पीडित मुलीला सेक्टर-53 परिसरातील पीजीमध्ये घेऊन गेला. यानंतर गौरवने रजत येताच तिच्यासमोर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रजतनेही तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने  विरोध केल्यानंतर तिला दोघांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.  (Crime News)

Web Title: noida girl sexual assault by facebook friend in gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.