धक्कादायक! मजुरांना चिरडणाऱ्या लॅम्बोर्गिनीचा मालक निघाला प्रसिद्ध युट्यूबर, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:02 IST2025-03-31T12:01:40+5:302025-03-31T12:02:13+5:30

भरधाव वेगाने येणाऱ्या लॅम्बोर्गिनीने दोन मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

noida lamborghini accident update police likely to question car owner youtuber | धक्कादायक! मजुरांना चिरडणाऱ्या लॅम्बोर्गिनीचा मालक निघाला प्रसिद्ध युट्यूबर, नेमकं काय घडलं?

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-९४ मध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या लॅम्बोर्गिनीने दोन मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात सहभागी असलेली कार प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारीची असल्याचं सांगितलं जात आहे, ज्याची पोलीस चौकशी करत आहेत. मृदुलला पोलीस स्टेशनला बोलावून अपघाताच्या वेळी गाडी कोणाच्या परवानगीने चालवली जात होती आणि त्यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

युट्यूबर मृदुल त्याच्या कुटुंबासह नोएडातील सुपरनोव्हा अपार्टमेंट्समध्ये राहतो आणि त्याच्या विनोदी व्हिडिओसाठी ओळखला जातो. त्याच्या 'द मृदुल' या यूट्यूब चॅनलचे सुमारे १९ मिलियन सबस्क्राइबर आहेत, तर इन्स्टाग्रामवर त्याचे ३५ लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य देखील YouTubers आहेत. या अपघाताशी मृदुलचा थेट संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपी दीपकला घटनास्थळावरून अटक

अपघातातील मुख्य आरोपी दीपक हा राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी आहे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये कार ब्रोकर म्हणून काम करतो. दीपकला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. अपघात झाला तेव्हा दीपक टेस्ट ड्राइव्ह दरम्यान लॅम्बोर्गिनी चालवत असल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांनी गाडी जप्त केली आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

मजुरांच्या पायांना फ्रॅक्चर

अपघातात जखमी झालेले विदास आणि रंभू कुमार यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोघांची प्रकृती सुधारत आहे. दोघांच्याही पायांना फ्रॅक्चर झाले होते. मजुरांनी सांगितलं की, वेगाने येणाऱ्या कारने अनेक लोकांना धडक दिली, परंतु ते सर्वात जास्त जखमी झाले. 

"कोणी मेलं आहे का?"

रविवारी नोएडाच्या सेक्टर-९४ मध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळील कार चालवत असताना लॅम्बोर्गिनीच्या चालकाने दोन मजुरांना चिरडलं. जखमी मजुरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. हे मजूर मूळचे छत्तीसगडचे आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरोपी त्याच्या कारमधून बाहेर आला आणि स्थानिकांना "कोणी मेलं आहे का?" असं विचारत आहे. 

Web Title: noida lamborghini accident update police likely to question car owner youtuber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.