स्वत:ला नेहा सांगत तरूणांसोबत मैत्री करत होती सोफिया, ब्लॅकमेल करून मागत होती पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:44 PM2023-03-30T12:44:05+5:302023-03-30T12:46:42+5:30

Crime News : लग्नाचा दबाव टाकल्यावर जेव्हा पीडित लग्नासाठी तयार होत होता तेव्हा ती पैशांची डिमांड करत होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

Noida police arrest girl who blackmail youth and demand money | स्वत:ला नेहा सांगत तरूणांसोबत मैत्री करत होती सोफिया, ब्लॅकमेल करून मागत होती पैसे

स्वत:ला नेहा सांगत तरूणांसोबत मैत्री करत होती सोफिया, ब्लॅकमेल करून मागत होती पैसे

googlenewsNext

Crime News : नोएडा पोलिसांनी एका अशा तरूणीला अटक केली आहे जी नाव बदलून आधी तरूणांसोबत मैत्री करत होती आणि नंतर प्रेमाच्या गोष्टी करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. लग्नाचा दबाव टाकल्यावर जेव्हा पीडित लग्नासाठी तयार होत होता तेव्हा ती पैशांची डिमांड करत होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

ही घटना नोएडाच्या सेक्टर 39 मधील आहे. नोएडाच्या सलारपूरमध्ये राहणारा सोनू सैफी एका कपड्याच्या दुकानावर काम करत होता. काही वेळाआधी सोफिया त्याच्या दुकानावर कपडे घेण्यासाठी गेली होती. बोलता बोलता सोफियाने त्याचा मोबाइल नंबर घेतला. सोनूने तिला नाव विचारलं तर तिने नेहा सांगितलं होतं. नंबर घेतल्यावर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं होतं.

काही दिवसांनी सोफियाने सोनूसोबत केलेलं चॅटींग आणि फोन कॉल्सच्या आधारावर त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली. सोनूने बदनामी होऊ नये म्हणून लग्नासाठी होकार दिला. 

सोनूने लग्नासाठी होकार दिल्यावर सोफियाच्या आशा वाढल्या. तिने त्याच्याकडे दोन लाख रूपयांची डिमांड केली. जेव्हा सोनूने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा ती त्याला ब्लॅकमेल करत होती. ती त्याला बदनाम करण्याची भीती दाखवत होती. सोफियाला कंटाळून सोनूने पोलिसात तक्रार दाखल केली.

सोनूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोफिया उर्फ नेहा ठाकूरला अटक केली. तिची चौकशी केली गेली. आधी ती पोलिसांसोबत खोटं बोलत होती. नंतर पोलिसांनी सक्तीने चौकशी केली तेव्हा समोर आलं की, तिने याआधीही अनेक तरूणांना फसवलं आहे.

Web Title: Noida police arrest girl who blackmail youth and demand money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.