पोलिसांनी OYO हॉटेलमध्ये टाकला छापा; नको त्या अवस्थेत सापडले कपल, ७ तरुणी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:36 PM2023-02-23T12:36:40+5:302023-02-23T12:50:42+5:30

नोएडा पोलिसांनी काल शहरातील हॉटेलमध्ये छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. नोएडातील सेक्टर-४१ येथील ओयो हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरू होते.

noida police raids noida oyo hotel seven girls rescued four arrested by police | पोलिसांनी OYO हॉटेलमध्ये टाकला छापा; नको त्या अवस्थेत सापडले कपल, ७ तरुणी ताब्यात

पोलिसांनी OYO हॉटेलमध्ये टाकला छापा; नको त्या अवस्थेत सापडले कपल, ७ तरुणी ताब्यात

googlenewsNext

नोएडा पोलिसांनी काल शहरातील हॉटेलमध्ये छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. नोएडातील सेक्टर-४१ येथील ओयो हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरू होते. बुधवारी रात्री उशिरा एसीपी-१ रजनीश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून ७ मुलींची सुटका केली असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. टोळीतील आरोपी दिल्ली-एनसीआरमध्ये हे रॅकेट चालवत होते. सध्या पोलीस हॉटेलच्या मालकाचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा सेक्टर-४१ येथील ओयो हॉटेलवर छापा टाकला. येथे अनैतिक कामे केली जात होती. दिल्ली आणि एनसीआरच्या इतर शहरांमध्येही हे रॅकेट सुरू होते. घटनास्थळावर पोलिसांनी मुलींची सुटका करून हॉटेल सील केले.

बहिणीची छेड काढल्यावरुन युवकाचा खून, निलगिरी बाग परिसरात खळबळ

आरोपींकडून सुमारे १५ मोबाईल फोन,  इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी कोतवाली सेक्टर-३९ पोलीस तपास करत आहेत. ओयो हॉटेलमध्ये हे अनैतिक काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींची चौकशी सुरू आहे. 

सेक्टर-४१ येथील निवासी भागातील घरांचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. येथे ओयोला तीन मजले देण्यात आले.या तिन्ही मजल्यांवर अहे रॅकेट सुरू होते.  सध्या पोलिसांनी हॉटेल सील करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: noida police raids noida oyo hotel seven girls rescued four arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.