कोठडीतील मृताची बत्तीस तासांनंतर उत्तरीय तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:44 AM2021-05-24T07:44:14+5:302021-05-24T07:44:58+5:30

Crime News: चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार धोती याचा पोलीस कोठडीत शनिवारी मृत्यू झाला होता.

Northern inquest after thirty-two hours of the dead in the cell | कोठडीतील मृताची बत्तीस तासांनंतर उत्तरीय तपासणी

कोठडीतील मृताची बत्तीस तासांनंतर उत्तरीय तपासणी

Next

आमगाव (जि. गोंदिया) : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार धोती याचा पोलीस कोठडीत शनिवारी मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल  ३२ तासांनंतर धोती याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी रविवारी  दुपारी १ वाजता गोंदिया येथे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली होती. पथकाने त्यांची चौकशी केल्यानंतर शुक्रवारी पहाटे १ वाजता मृत धोती, सुरेश राऊत व राजकुमार मरकाम या तिघांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या आरोपींना दुसऱ्या दिवशीही आमगाव पोलिसांकडे सोपविता येऊ शकत होते; परंतु गुन्हे शाखेने रात्रीच आरोपींना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन का केले, गुन्हे शाखा पोलिसांनी अटक असलेल्यांना मारहाण केली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजकुमार धोती याच्या मृतदेहावर आमगाव येथे उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. नागरिकांचा आक्रोश पाहता मृतदेह गोंदियाला पाठविण्यात आला. गोंदियातही रविवारी दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. आमगाव येथील न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासमक्ष गोंदियातील तीन डॉक्टरांच्या चमूने उत्तरीय तपासणी केली व त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चोख बंदोबस्तात आमगावला रवाना करण्यात आला. अंत्यसंस्कार होईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त हाेता. 

पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली भेट
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी आमगाव येथे भेट दिली. यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणात दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सीआयडीमार्फत उच्चस्तरीय तपास करावा. मृताच्या कुटुंबीयांना शासन व पोलीस विभागाकडून आर्थिक मदत द्यावी. कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली.

Web Title: Northern inquest after thirty-two hours of the dead in the cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.