कार नाही, सायलेन्सर चोरून लाखो कमावतायत चोर, Maruti ची ‘ही’ कार ठरतेय टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:54 PM2023-01-24T15:54:21+5:302023-01-24T15:54:43+5:30

देशातील विविध राज्यांमध्ये कार सायलेन्सरच्या चोरीच्या घटना पहायला मिळत आहेत. लखनौ, पुणे, मुंबई, अहमदाबाद अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा टोळ्या सक्रिय आहेत.

Not a car thieves earn millions by stealing silencers Maruti suzuki s eeco car becomes the target high price metal | कार नाही, सायलेन्सर चोरून लाखो कमावतायत चोर, Maruti ची ‘ही’ कार ठरतेय टार्गेट

कार नाही, सायलेन्सर चोरून लाखो कमावतायत चोर, Maruti ची ‘ही’ कार ठरतेय टार्गेट

googlenewsNext

कार चोरीच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण सायलेन्सर चोरीच्या घटनेने तुम्हाला विचार करायला भाग पाडलंय का? अलीकडच्या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये सायलेन्सर चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसह वाहनधारकांपुढेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. म्हणजेच आता चोरांची नजर तुमच्या कारवर नाही, तर तुमच्या कारच्या सायलेन्सरवर आहे. यासाठी प्रत्येक कार नाही तर मारुती सुझुकीची एक विशिष्ट कार चोरांच्या टार्गेटवर आहे. लखनौ, पुणे, मुंबई, अहमदाबाद अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा टोळ्या सक्रिय आहेत, ज्या कारचे सायलेन्सर अवघ्या काही मिनिटांत गायब करतात.

मारुती सुझुकीची सर्वात परवडणारी व्हॅन मारुती ईको सध्या चोरांसाठी सॉफ्ट टार्गेट आहे. या प्रकरणी दक्षिण लखनौच्या अतिरिक्त एसपी मनीषा सिंह यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मोहनलालगंज पोलीस स्टेशन परिसरात अशाच एका टोळीला अटक करण्यात आली होती जी कार सायलेन्सर चोरीची घटना घडवत होती. हे चोरटे फार कमी वेळात गाडीचे सायलेन्सर काढून त्यात सापडणाऱ्या डस्टमधील महागडे घटक ब्लॅक मार्केटमध्ये विकायचे असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, पोलिसांचे लक्ष या घटनेकडे गेले कारण बहुतेक प्रकरणांमध्ये मारुती सुझुकी इको या कारचेच सायलेन्सर चोरीला गेल्याची नोंद होत होती. मनिषा सिंह सांगतात की, या प्रकरणात सहभागी असलेले आरोपी सायलेन्सरमधून निघणारे डस्ट मोठ्या प्रमाणात गोळा करून दिल्लीतील एका व्यावसायिकाला विकायचे.

यात काय आहे खास?
चोरांना कारचे सायलेन्सर चोरण्यात अधिक रस असतो कारण ते उघडणे सोपे असते आणि त्यात काही महागड्या धातूंनी बनवलेले कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असते. BS6 वाहनांमधील वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीने कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जोडल्यानंतर चोरीच्या घटना वाढल्या. सायलेन्सरमध्ये सापडलेली मेटल डस्ट काळ्या बाजारात चढ्या भावाने विकली जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जुन्या वाहनांच्या तुलनेत नवीन वाहनांमध्ये डस्टचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच नव्या बीएस 6 कार्सना टार्गेट केले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काळ्या बाजारात मेटल डस्टची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,000 ते 4,000 रुपये आहे, तर एक्झॉस्ट गॅसमधील ऑक्सिजनची पातळी ओळखणारे सायलेन्सरमधील सेन्सर चोर सहजपणे 10 हजार ते 15 हजार रुपयांना विकू शकतात. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या चोरीमागे पैसा हे मुख्य कारण आहे. यात (PGM) ग्रुपच्या तीन मौल्यवान धातूंचा समावेश आहे जे रासायनिक अभिक्रियामध्ये मदत करतात. ज्यामुळे सायलेन्सरमधून बाहेर पडणारे प्रदूषक कमी हानिकारक बनतात. यामध्ये प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांचा समावेश आहे.

Web Title: Not a car thieves earn millions by stealing silencers Maruti suzuki s eeco car becomes the target high price metal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.