थोडी थोडकी नाही! ५० सेलिब्रिटींची यादी तयार; एनसीबी फास आवळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:11 AM2020-09-25T06:11:33+5:302020-09-25T06:15:02+5:30
सिमोन खंबाटा, श्रुती मोदीसह चौघांची एनसीबीकडून सहा तास चौकशी
ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाऱ्या सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेटबाबत एनसीबीने गुरुवारी फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा व सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीसह टीव्ही कलाकार अबीगेल व सनम जोहर यांची चौकशी केली. सहा तासांच्या चौकशीतून त्यांना बॉलिवूडमधील अमली पदार्थांच्या संबंधांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची चौकशी अपूर्ण असून त्यांना पुन्हा पाचारण केले जाणार आहे.
तस्कर अनुज केशवानी व जया साहा यांच्याकडील चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्ज संबंधित अभिनेत्रींची नावे समोर आली. त्याअनुषंगाने फॅशन डिझायनर सिमोन खंबाटाला समन्स जारी केले होते. सिमोन व श्रुती गुरुवारी दुपारी कार्यालयात हजर झाल्या. श्रुतीकडे सुशांत, रिया व अन्य ड्रग्ज तस्करांशी संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. तर सिमोनकडे पार्ट्यांमध्ये सीबीडी आॅईल आणि ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांबाबत विचारणा करण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, टीव्ही कलाकार अनीबेल व सनम जोहर यांच्या जुहू येथील घरी बुधवारी छापा टाकला होता. त्यांना चौकशीसाठी कार्यालयात पाचारण केले होते.
५० सेलिब्रिटींची यादी तयार
ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाºया सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.