घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 08:44 AM2023-05-25T08:44:24+5:302023-05-25T08:44:34+5:30
कामोठेचे व्यावसायिक दत्तात्रेय कमलाकर गोवारी यांनी २०२१ मध्ये दासला घर बांधण्यासाठी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : धनादेश व रोखीने घेतलेले साडेनऊ लाख रुपये परत न केल्याने ठेकेदार विनोद दास यांच्या विरोधात कामोठे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घर न बांधताच पैसे घेऊन पळाल्याचा दासवर आरोप आहे.
कामोठेचे व्यावसायिक दत्तात्रेय कमलाकर गोवारी यांनी २०२१ मध्ये दासला घर बांधण्यासाठी दिले. एकूण १६ लाख ३० हजार देण्याचे ठरले. अनामत रक्कम म्हणून पाच लाख दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून चार ते पाच लाख रुपये मागितल्याने गोवारी यांनी त्याला साडेचार लाख रोख दिले.
झारखंडला गेला निघून
यानंतर तो काहीही काम न करता त्याच्या मूळ गावी झारखंड याठिकाणी पळून गेला. त्याने बांधकामापोटी घेतलेली साडेनऊ लाख रुपयांची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे विनोद दास याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.