कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 09:27 PM2018-12-07T21:27:54+5:302018-12-07T21:28:34+5:30

याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डी. के. रावच्या मृत हस्तकाचे नाव मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (वय ४०) असं आहे. 

Notorious Gund D. K. Rao's murderer murdered; The accused fled after the bike was not started | कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत 

कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची हत्या; बाईक सुरु होत नसल्याने आरोपी सुटले पळत 

Next

मुंबई - कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाच्या घरात घुसून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डी. के. रावच्या मृत हस्तकाचे नाव मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (वय ४०) असं आहे. 

टी. पी. राजा हा  डी. के. रावचा हस्तक सायन कोळीवाडा येथील म्हाडा कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्याच्या घरात दोन अज्ञात इसम घुसले आणि चाकूने त्याच्यावर वार करून हत्या केली. गळ्यावर आरोपींनी जबर वार केला आणि रक्ताने माखलेले कपड्यावरच दोन आरोपी इमारतीखाली बाईक सुरु करून पाळण्याच्या इराद्यात होते. मात्र, बाईक सुरु होत नसल्याने त्यांनी पायीच पळ काढला. मृत टी. पी. राजाविरोधात देखील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी डी. के. रावच्या टोळीतून राजाने बँकेतून ६६ लाख लुटले होते. दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा त्याने खून केला होता. याप्रकरणी मोक्का केसमध्ये राजा अटक होता. तीन वर्षांपूर्वी राजाची जामिनावर सुटका झाली होती आणि तो सायन कोळीवाडा येथे राहत होता. आज दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. 

Web Title: Notorious Gund D. K. Rao's murderer murdered; The accused fled after the bike was not started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.