कुख्यात एमडी ड्रग तस्कर आबूखानचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:06 PM2020-04-28T15:06:06+5:302020-04-28T15:08:00+5:30

सुरक्षा रक्षकामुळे टळली घटना मध्यवर्ती कारागृहात खळबळ

Notorious MD drug smuggler Abu Khan attempts suicide pda | कुख्यात एमडी ड्रग तस्कर आबूखानचा आत्महत्येचा प्रयत्न

कुख्यात एमडी ड्रग तस्कर आबूखानचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसोमवारी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वेळीच सुरक्षारक्षकाने धाव घेतल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.कुख्यात आबू हा मध्य भारतातील एमडी तस्कर म्हणून कुख्यात आहे. त्याने नागपूर विदर्भातच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातही एमडी तस्करीचे जाळे फैलावले होते.

नागपूर : मध्य भारतातील कुख्यात एमडी तस्कर आबू उर्फ फिरोजखान अजीजखान (वय ४८, रा. ताजबाग सक्करदरा) याने मध्यवर्ती कारागृहातील कोठडीत गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्‍न केला. सोमवारी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वेळीच सुरक्षारक्षकाने धाव घेतल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.


 या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुख्यात आबू हा मध्य भारतातील एमडी तस्कर म्हणून कुख्यात आहे. त्याने नागपूर विदर्भातच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातही एमडी तस्करीचे जाळे फैलावले होते. त्याच्या जाळ्यात अडकलेले अनेक तरुण तरुणी व्यसनाधीन झाले होते. एवढेच नव्हे तर त्याच्या साथीदारांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांनाही आपल्या जाळ्यात ओढून त्यांना व्यसनाधीन केले होते. त्यांच्याकडून तो एमडीची तस्करी करून घेत होता. त्याच्या नेटवर्कमध्ये काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही होते. जानेवारी २०१९ मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या अड्ड्यावर छापा घालून त्याचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. त्याच्यासह अनेक साथीदारांना अटक केली. त्याच्या तस्करीत साथ देणार्‍या चार पोलीस निरीक्षकांसह सहा जणांविरूद्धही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी निलंबनाची कारवाई केली होती.  १६ जानेवारीपासून कुख्यात आबू कारागृहात आहे. त्याला मध्यवर्ती कारागृहातील अतिसुरक्षा विभागात (अंडा सेल मध्ये) ठेवण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १.५०  वाजताच्या सुमारास त्याच्या कोठडीतून काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने कारागृह रक्षक शरद निळकंठ जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आबूच्या कोठडीकडे धाव घेतली. आत मधील चादर फाढून त्याची त्याने दोरी तयार केली होती. तिच्या एका टोकाला त्याने पाणी पिण्याचा प्लास्टिकचा मग अडकवला होता आणि दुसर्‍या टोकाचा फास तयार करुन स्वताच्या गळ्यात टाकला होता. प्लास्टिकचा मग सिलिंग फॅनवर फेकून गळफास घेण्याची त्यांची तयारी होती. मात्र मग खाली पडल्याने आवाज झाला आणि कारागृहातील रक्षक धावल्यामुळे त्याचा प्रयत्न उधळला गेला. त्याला लगेच कोठडी बाहेर काढण्यात आले.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामिया एल्युमिनाई असोसिएशनच्या अध्यक्षाला अटक

गुप्तांग चावून केली हत्या, स्टेरॉइडसारख्या उत्तेजक पदार्थांच्या अतिसेवनाने घडला धक्कादायक प्रकार 

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर १० परदेशी तबलिगींना मुंबई पोलिसांनी केली अटक  

प्रचंड गोंधळ
 या घटनेनंतर आबूने प्रचंड गोंधळ घातला. ही माहिती कळताच कारागृह अधीक्षक अनुप कुमरे आणि त्यांचे सहकारी तिकडे धावले. त्यांनी आबूचे समुपदेशन केले. तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आपल्याला जगायचे नाही, असे म्हणत त्याने तेथे प्रचंड आरडाओरड सुरू केली. कारागृह रक्षकांनी नंतर मोबाईलच्या माध्यमातून आबूच्या पत्नी आणि आईशी संपर्क साधून त्यांची बोलणी करून दिली. सायंकाळी आबू शांत झाला. त्यानंतर त्याला परत कोठडीत टाकण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. कारागृहा तर्फे रक्षक शरद जाधव यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आबूच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

नैराश्यातून घडला प्रकार
एमडी तस्कर आबूला मोठ्या प्रमाणात रोज एमडी पिण्यासाठी लागत होती. कारागृहात अति सुरक्षा विभागात डांबल्यामुळे त्याला काहीही शक्य होत नाही. १६ महिन्यांपासून त्याला जामीनही मिळालेला नाही. त्यामुळे तो नैराश्याच्या गर्तेत अडकला आहे. त्यातून त्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कारागृह अधीक्षक कुमरे यांनी लोकमत'शी बोलताना सांगितली.

Web Title: Notorious MD drug smuggler Abu Khan attempts suicide pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.