आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 21:23 IST2022-01-05T21:20:59+5:302022-01-05T21:23:40+5:30
Cyber Crime : ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा
टेलिग्राम वाहिनीने हिंदू महिलांना लक्ष्य केले आहे. आता अश्लील फोटोंच्या माध्यमातून हिंदू महिलांना लक्ष्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलीस आता याप्रकरणी अधिकृत तक्रारीची वाट पाहत आहेत. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवता येईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, टेलिग्राम वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. वास्तविक, गेल्या वर्षी जूनपासून टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्स आणि चॅनेलवर अश्लील गोष्टी पोस्ट केल्या जात होत्या. याप्रकरणी अंशुल सक्सेना नावाच्या युजरने मुंबई पोलिसांना टॅग करत एक टेलिग्राम चॅनल हिंदू महिलांना टार्गेट करत असल्याचे लिहिले आहे. हे टेलिग्राम चॅनल जून २०२१ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यांचे हे ट्विट ट्विट करताना मीरा मोहंती नावाच्या युजरने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले. त्यानंतर मंत्री महोदयांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Why not ask the IT and Telecommunication minister @AshwiniVaishnaw or home minister to do something about this, if you are actually concerned? https://t.co/bBfsZKKFPn
— Meera Mohanty (@meeramohanty) January 4, 2022
मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. उत्तराखंडमधून श्वेता सिंगसह उत्तराखंडमधील आणखीन एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामागे नेमके कोण आहे याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.