आता ईडीने फास आवळला, तबलिगी जमातचे मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:29 PM2020-04-16T22:29:57+5:302020-04-16T22:34:26+5:30

साद यांच्याविरोधात PMLA (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Now the ED registered case, increasing the difficulty of Maulana Saad of the Tbilighi jamat pda | आता ईडीने फास आवळला, तबलिगी जमातचे मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ

आता ईडीने फास आवळला, तबलिगी जमातचे मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ

Next
ठळक मुद्दे मौलाना साद यांच्यासह 9 जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जाणार आहे.

नवी दिल्ली - तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीपोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात मनी लाऊण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. साद यांच्याविरोधात PMLA (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तबलिगी जमातच्या मौलानाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दिल्ली पोलिसांची देधडक कारवाई

सध्या मी क्वारंटाईनमध्ये आहे, बाकी नंतर पाहू! मौलाना साद यांचे क्राईम ब्रँचला उत्तर 

CoronaVirus : तबलिगी जमातचे मौलाना साद यांना क्राईम ब्रँचची नोटीस, विचारले हे 26 प्रश्न

यावेळी ईडी तबलिगी जमातला दिल्या जाणाऱ्या फंडबाबत चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मौलाना साद यांच्यासह 9 जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्या - खाण्यासाठी कुठून फंड दिला जात होता. भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्यांना कोणी अर्थसहाय्य केलं आणि त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला? आदी प्रश्नांची उत्तरे ईडी शोधणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जाणार आहे.

 

Web Title: Now the ED registered case, increasing the difficulty of Maulana Saad of the Tbilighi jamat pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.