बँकेत फोन नंबर अपडेट न करणं पडलं महागात; 'ही' एक छोटीशी चूक, बसला 57 लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:23 PM2023-09-23T12:23:56+5:302023-09-23T12:32:32+5:30

स्कॅमर्सने 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ऑनलाईन फसवणूक झाली.

nri loses 57 lakhs to scammers dont forget to update phone number with bank you may land in trouble | बँकेत फोन नंबर अपडेट न करणं पडलं महागात; 'ही' एक छोटीशी चूक, बसला 57 लाखांचा फटका

बँकेत फोन नंबर अपडेट न करणं पडलं महागात; 'ही' एक छोटीशी चूक, बसला 57 लाखांचा फटका

googlenewsNext

भारतात ऑनलाईन स्कॅम वेगाने वाढत आहेत. लोकांचा पैसा लुटण्यासाठी स्कॅमर्स अनेक मार्ग शोधत आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात रमनदीप एम ग्रेवाल यांची स्कॅमर्सने 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ऑनलाईन फसवणूक झाली. सिम डिस्कनेक्ट झाल्यानंतर ती व्यक्ती आपला फोन नंबर बँकेत अपडेट करायला विसरली होती.

एका रिपोर्टनुसार, लुधियानात नुकतीच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणारा सुखजित सिंह, बिहारचा लव कुमार, गाझीपूरचा नीलेश पांडे आणि दिल्लीचा अभिषेक यांचा समावेश होता. या स्कॅमर्सनी रमनदीप एम ग्रेवाल नावाच्या व्यक्तीला लक्ष्य केले आणि त्याचा जुना डिस्कनेक्ट केलेला फोन नंबर वापरून त्याच्या बँक खात्यातून 57 लाख रुपये काढले.

स्कॅमर्सनी प्रथम अशा लोकांचा शोध घेतला ज्यांचे तपशील सहजपणे काढले जाऊ शकतात, ज्यात अनेक वृद्ध लोक आणि इनएक्टिव्ह अकाऊंट असलेल्या लोकांचा समावेश होतो. मग त्याने रमनदीपच्या खात्याचा तपशील काढला. तेव्हा त्यांना कळलं की त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करून दुसऱ्याला देण्यात आला आहे. स्कॅमर्स सिमच्या नवीन मालकाला फोन करून नोकरीचे आमिष दाखवून सिम ट्रान्सफर करून घेतात. 

स्कॅमर्सना ओळखीची कागदपत्रे मिळाली आणि त्यांनी नंबर पोर्ट केला. नंतर फोन नंबर वापरला गेला आणि ग्रेवालची नेट बँकिंग हॅक झाली. ईमेल बदलून नेट बँकिंगद्वारे नवीन डेबिट कार्ड बनवलं. त्यानंतर त्यांनी खात्यातून तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. हा प्रकार ग्रेवाल यांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या लोकांकडून 17.35 लाख रुपये जप्त केले. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील 7.24 लाख रुपये गोठवण्याबरोबरच एक मॅकबुक एअर, चार मोबाईल फोन, तीन चेकबुक आणि आठ एटीएम डेबिट/क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.

'हे' ठेवा लक्षा

स्कॅमर्सनी तुमचे पैसे चोरण्यासाठी काहीही करू शकतात. परंतु आपण सावध असणं आवश्यक आहे. केवळ सतर्क राहणंच तुम्हाला स्कॅमपासून वाचवू शकतं. या प्रकरणावरून हे स्पष्ट झाले आहे की वेळोवेळी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की फोन नंबर इत्यादी अपडेट करत राहावे लागेल. पण ते करताना काळजी घ्या. विशेषत: तुमचं जुने सिमकार्ड बंद झालं असेल आणि तुम्ही ते अद्याप अपडेट केलं नसेल, तर तुम्ही अशा प्रकारच्या स्कॅममध्ये अडकू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: nri loses 57 lakhs to scammers dont forget to update phone number with bank you may land in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.