तोकडे कपडे आणि अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच! बारवर छापा, 41 जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:43 PM2021-09-17T21:43:44+5:302021-09-17T21:44:28+5:30
Raid on Bar : मानपाडा हद्दीत पुन्हा एका बारवर छापा, 41 जण ताब्यात; कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई
डोंबिवली: मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बार व्यावसायिकांकडून कोरोनाचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत. सोशल डिस्टन्स पाळले जात नसताना महिलांचा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे घालून अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच असल्याचे पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे. शुक्रवारी मोनालिसा बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले असताना पुन:श्च या हद्दीतीलच 'लोटस' या लेडीज सर्विस बारवर टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना निदर्शनास आल्या. बुधवारी केलेल्या या कारवाईत संबंधित 10 महिला, बार मॅनेजर आणि वेटर असे 12 जण तर 19 ग्राहक अशा 41 जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
हा बार डोंबिवली पुर्वेकडील कल्याण-मानपाडा रोडवर आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याची माहीती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली. संबंधित बार व्यावसायिकाकडे परवाना नसतानाही त्याठिकाणी लेडीज सव्र्हीस देवून ग्राहकांना आकर्षित करणोकरीता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून हावभाव करून अश्लील कृत्य करीत आहेत. त्याप्रमाणे पाटील यांच्या पथकाने संबंधित बारवर छापा टाकला असता बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणो त्याठिकाणी गैरकृत्य सुरू असल्याचे दिसून आले. तेथील महिलांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशन डिस्टन्सचा फज्जा देखील उडाला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी रोकड आणि गाणी वाजविण्याचे साहीत्य असा 24 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक मानपाडा पोलिसांचा कानाडोळा
मागील आठवडयात शुक्रवारी कल्याण पुर्वेकडील हाजीमलंग रोडवर असलेल्या मोनालिसा बारमध्ये टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला वेटर विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना आढळुन आल्या होत्या. या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा 56 जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने लोटस बारवर धाड टाकून त्याठिकाणी सुरू असलेल्या अश्लील हावभाव आणि कृत्याचा पर्दाफाश केला आहे. हे दोन्ही बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. परंतू त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या 'धिंगाण्या'कडे मानपाडा पोलिसांचा होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या कार्यपध्दतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.