Nupur Sharma Controversy: नुपुर शर्माची पोस्ट का पाहतोस..? असे म्हणत तरुणाला चाकुने भोसकले, प्रकृती नाजुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:58 PM2022-07-19T13:58:04+5:302022-07-19T14:02:35+5:30
Nupur Sharma Controversy: बिहारच्या सीतामडी जिल्ह्यात मोबाईलवर नुपूर शर्माची पोस्ट पाहणाऱ्या तरुणावर टोळक्याने 5-6 वार केले.
Nupur Sharma Controversy: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे सुरू झालेला वाद दीड महिन्यानंतरही थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच कन्हैयालाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता ताजे प्रकरण बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील नानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहेरा जाहिदपूरमध्ये घडले आहे. येथे राहणारा अंकित झा त्याच्या मोबाईलवर नुपूर शर्माची पोस्ट पाहत होता, यामुळे संतापलेल्या काही विशिष्ट समाजातील मुलांनी त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. अंकितला सध्या दरभंगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो जीवन-मरणाची झुंज देत आहे. जखमी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जखमी युवक अंकितने रुग्णालयात प्रसारमाध्यमांना सांगितले की, शनिवारी गावापासून दूर असलेल्या नानपूर येथील एका पानाच्या दुकानात उभा राहून तो आपल्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माची पोस्ट पाहत होता, तेव्हा शेजारी उभे असलेले तीन तरुण सिगारेट ओढत होते. मी माझ्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माची पोस्ट पाहणे त्यांना अडवले नाही, तू नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? असा सवाल त्यांनी केला. अंकितने त्यांना तुमचा काय संबंध असे सांगताच त्यांनी सिगारेटचा धूर तोंडावर फेकला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या तरुणांपैकी एकाने चाकू काढून अंकितवर 5-6 वार केले. या घटनेत अंकित गंभीर जखमी झाला, त्याला चालू लागल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अंकितच्या वडिलांचे आरोप
दुसरीकडे, जखमी अंकितचे वडील मनोज झा यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी आपल्यावर दबाव आणून स्वत:च्या मर्जीने प्रकरण लिहून घेतले आहे. तक्रारीतून नुपूर शर्माचे प्रकरण वगळण्यात आले आहे. या घटनेनंतर आम्ही खूप घाबरलो आहोत. हल्लेखोर पुन्हा आमच्यावर हल्ला करू नयेत, यासाठी झा यांनी पोलिसांना मदतीची मागणी केली आहे.