Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:33 PM2022-07-19T15:33:04+5:302022-07-19T16:35:02+5:30
Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी पाकिस्तानातून एक घुसखोर भारतात पोहोचला होता. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अलीकडेच राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ २४ वर्षीय पाकिस्तानी नागरिकाला पकडले. रिझवान अशरफ असे या व्यक्तीचे नाव आहे. नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे.
त्यावेळी ही व्यक्ती हिंदुमलकोट सेक्टरमधील खाखान चेकपोस्टवरून देशाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही मिळाली होती. पाकिस्तानातील पंजाबमधील मंडी बहा बीन येथील रहिवासी असलेल्या अशरफबाबत आता धक्कादायक खुलासे होत आहेत.
अशरफच्या भारतात येण्यामागचा हेतू अत्यंत घातक होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएफच्या चौकशीत उघड झाले आहे की, या घुसखोराला भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माची हत्या करायची होती. नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अशरफ दुखावला होता.
अजमेर दर्ग्यात जायचे होते
भारतात प्रवेश केल्यानंतर अशरफ श्री गंगानगरहून अजमेर दर्ग्याला जायचे होते, अशी माहिती अशरफने आहे. येथे चादर अर्पण केल्यानंतर त्याने नुपूर शर्माला मारण्याचा कट रचला होता. आठवीपर्यंत शिकलेल्या अशरफला उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषा अवगत आहेत. मात्र, त्याच्याकडून शस्त्रे सापडलेली नाहीत.