मध्यरात्री 1 वाजता तरुणीला भेटायला उत्साहात पोहोचला तरुण अन् त्यानंतर जे काही घडले ते होते भयानक...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:44 PM2022-03-16T15:44:47+5:302022-03-16T15:45:15+5:30
Crime News : पीडित तरुणाच्या भावासोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरू असतानाही चाकूने वार करण्यात आले आणि जवळपास 76 लाख रुपयांची खंडणी मागितली.
इंस्टाग्रामवर तरुणीसोबत झालेल्या चॅटनंतर एक तरूण तिला भेटण्यासाठी एका अपार्टमेंटमध्ये पोहोचला. मात्र प्रत्यक्षात हा तरूण हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला. हे प्रकरण अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरातील आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित तरूणाने आरोप केला आहे की, तो ज्या तरुणीसोबत चॅट करत होता. तिने त्याचे अपहरण केले आणि तासनतास त्याच्यावर अत्याचार केले. या तरुणाच्या भावासोबत व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरू असतानाही चाकूने वार करण्यात आले आणि जवळपास 76 लाख रुपयांची खंडणी मागितली.
दरम्यान, या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला. त्याला बांधून व्हॅनच्या मागे जखमी अवस्थेत टाकण्यात आले होते. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅलेरी रोझारियो असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती 22 वर्षांची आहे. या तरुणीवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, तरूण मार्बल हिल अव्हेन्यू येथे रात्री उशिरा एक वाजता तरुणीकडे पोहोचला होता. यानंतर तरुणीने त्याच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसेच, कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, त्या अपार्टमेंटमध्ये तीन जणांनी आधीच प्रवेश केला होता. त्यापैकी एकाकडे पिस्तूल होते. व्हॅलेरी आणि तिच्या साथीदारांनी पीडित तरुणाचे कपडे काढले. त्याला बाथटबमध्ये नेले आणि त्याच्यावर काही ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावली. त्यानंतर त्याच्या पायावर आणि पाठीवर चाकूने वार केले.
पीडित तरुणाला व्हॅलेरी हिने आपल्या जाळ्यात ओढण्यामागील कारण म्हणजे इंस्टाग्रामवर तरुण आपल्या श्रीमंतीचा पुरावा देत होता. पैशाच्या लालसेपोटी व्हॅलेरी हिने पीडित तरुणासोबत अशाप्रकारे कट रचला. मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टातील सहाय्यक जिल्हा वकील अँड्र्यू क्लुगर यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि त्या व्यक्तीचा तासनतास छळ केला.
दाखल तक्रारीनुसार, दुपारी पीडित तरुणाच्या भावाला व्हिडिओ कॉल आला. मास्क घातलेल्या अपहरणकर्त्यांनी खंडणीची मागणी केली आणि त्यापैकी एकाने त्याच्या भावावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी एकजण म्हणाला- 'आम्हाला एक लाख डॉलर दिले नाही, तर तुझ्या भावाला मारून टाकू'. नंतर यातील एक आरोपी जेवियर वर्गास याला पोलिसांनी अटक केली आहे.