OBC Reservasion : रोहिणी व एकनाथ खडसेंची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:46 PM2021-06-26T21:46:49+5:302021-06-26T21:47:34+5:30
OBC Reservasion :सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या व्यक्तीविरुध्द शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव : भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टिका केली म्हणून जिल्हा बँकेच्या चेअरमन तथा राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या व्यक्तीविरुध्द शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड.रोहिणी खडसे यांनी व्टीटर या सोशल मीडिया वेबसाईटवर ‘भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून आला?, ओबीसी नेत्याचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा आवळण्यात काय अर्थ’ अशी टीका केली होती.
त्यावर ‘सपोर्ट युथ नगमा २१६’ या नावाच्या युजरधारकाने ॲड.रोहीणी व एकनाथराव खडसे यांच्याविषयी शिवीगाळ करुन आक्षेपार्ह टीका केली. सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. त्यामुळे खडसे परिवाराची बदनामी झाली म्हणून अशोक सिताराम लाडवंजारी (वय ४८,रा.मेहरुण, जळगाव) यांनी गुरुवारी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहे.