शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 04:32 PM2021-05-22T16:32:39+5:302021-05-22T16:54:24+5:30

BJP Yuva Morcha state secretary detained : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

Objectionable tweet against Sharad Pawar, BJP Yuva Morcha state secretary detained by mumbai police | शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देप्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे.

पुणे : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबईपोलिसांनी आज सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे हे  राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष धुवाळी यांच्यासोबत काम करत असून धुवाळी यांनी दिलेल्या माहितीवरून जावळे यांनी तक्रार देऊन मुंबईपोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात प्रदिप गावडे यांनी ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबाबत १३ मेला जबाब जावळे यांनी दाखल केला. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्याहून मुंबईत चौकशीसाठी आणले आहे. मात्र, कोणताही एफआयआर किंवा ४१ अ ची नोटीस दिली असता असे चौकशीसाठी घेऊन जाणे बेकायदेशीर असल्याचं गावडे यांचे वकील संकेत देशपांडे लोकमतशी बोलताना म्हणाले. 

मात्र प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे. भाजप युवा मोर्चा  प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पंढरपूर निवडणुकीदरम्यान रोहीत पवारांच्या प्रचारासंदर्भात काही ट्वीट केले होते. त्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला एफआयआरची कॅापी न देता बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत अटक करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असुनही अटक झाली आहे. 

भाजप युथ विंगचे राज्य सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी १० मेला पुणे सायबर पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी पोलीसांनी राष्ट्रवादी युथ विंगचे दोन कार्यकर्ते मोहसिन शेख आणि शिवाजीराव जवीर यांना अटक केली होती. बाजपेयी यांनी केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंशी छेडखानी करुन सोशल मिडियावर पोस्ट केले होते. आता गावडे यांनी पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत ५४ जणांविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली होती.

त्याआधी ४ मेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही राजकीय नेते यांच्याविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट आणि मॅसेजेस् फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर पसरवल्याप्रकरणी १३ जणांविरोधात पहिल्यांदा प्राथमिक तक्रार दाखल झाली होती.

Web Title: Objectionable tweet against Sharad Pawar, BJP Yuva Morcha state secretary detained by mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.