ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने करायचा अश्लिल चाळे, मनसैनिकांनी असा शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:26 PM2021-08-09T12:26:37+5:302021-08-09T12:51:19+5:30
Crime News: अमरावती जिल्ह्यात एका सिक्युरिटी इंचार्जला महिलांची छेड काढणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे.
अमरावती - अमरावती जिल्ह्यात एका सिक्युरिटी इंचार्जला महिलांची छेड काढणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप करत या ५० वर्षीय व्यक्तीची धुलाई केली आहे. या मारहाणीमुळे सदर इसम जागेवरच बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. (Obscene behavior under the pretext of measuring the dress, Lesson taught by MNS activists)
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार ५० वर्षांचा अरुण गाडवे हा सिक्योरिटी इंचार्ज अमरावतीमधील एका रुग्णालयामध्ये काम करतो. तेथील महिला कर्मचाऱ्यांनी आरोप केला की, गाडवे हा ड्रेस कोडचे माप घेण्याच्या बहाण्याने महिलांसोबत अश्लिल वर्तन करत असे. एवढेच नाही तर एखाद्या महिलेने याची तक्रार केल्यास तो त्या महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असे. त्याच्या या रोजच्या चाळ्यांना वैतागलेल्या महिलांनी त्याला धडा शिकवण्यासाठी एक योजना आखली.
या महिलांनी अरुण गाडवेची तक्रार एमएनएसच्य्या कार्यकर्त्यांकडे केली. त्यानंतर मनसैनिकांनी गाडवेला रस्त्यात अडवले. त्यानंतर त्याला खडसावून त्याची धुलाई केली. दरम्यान, गाडवेला महिलांनीही. मारहाण केली. यामध्ये तो बेशुद्ध पडला. त्यानंतर गाडीत बसवून त्याला पोलीस ठाण्याच नेण्यात आले. तिथे पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत.