आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:56 PM2021-02-01T21:56:37+5:302021-02-01T21:59:02+5:30
तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली.
बाभूळगाव: इंदापूर शहरात आजीकडे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे करीत करून छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यानुसार पोलीसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवम संतोष क्षीरसागर, संतोष मोहन क्षीरसागर, सारिका संतोष क्षीरसागर (सर्व रा. अंबीकानगर, देशपांडे वाड्यासमोर, इंदापूर, जि. पुणे) व मंगल मोहन क्षीरसागर (रा. जिती, ता. करमाळा, जि. सोलापूर), शामल विनायक जाधव (रा. कात्रज, भारती विद्यापीठ पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलगी ही तीच्या आजीकडे इंदापूर येथे रहात आहे. तर फिर्यादी या बारामती येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तर त्यांच्या सासुबाई या वयस्कर व एकट्याच आहेत. त्या नातीसोबत इंदापूर येथे राहत आहेत. तसेच फिर्यादीच्या सासुबाई या वयोवृृद्ध व मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने अनेकदा औषधोपचार कामी व कार्यक्रमानिमीत्त नातेवाईकाकडे वारंवार बाहेरगावी जातात. यावेळी पीडीत मुलगी घरी एकटीच राहत आहे.
फिर्यादी यांचे सासुबाईचे घराशेजारी त्यांचे जवळचे नातेवाईक राहण्यास आहेत. त्यांचेच नात्यातील शिवम संतोष क्षीरसागर याने नात्यातील ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादी यांचे अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. या घटनेबाबत मुलीच्या आईला नातेवाईकांकडुन माहिती मिळाली. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपी आणि पीडित यांच्याकडे केलेल्या चौकशी केली.यावेळी संबंधित प्रकार खरा असल्याचे पुढे आले.यावेळी मुलीच्या आईने आरोपीविरोधात इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दि. २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.