अश्लील व्हिडिओ पाहण्याचे लागले व्यसन, विद्यार्थ्याने टॉयलेटमधील मुलींचे VIDEO केले रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:57 AM2022-11-23T08:57:42+5:302022-11-23T09:03:02+5:30

Crime News : ही घटना दक्षिण बंगळुरूच्या होसाकेरेहल्ली येथील एका खासगी महाविद्यालयातील आहे.

obsessed with adult video a college student films girls in toilets bengaluru, crime news  | अश्लील व्हिडिओ पाहण्याचे लागले व्यसन, विद्यार्थ्याने टॉयलेटमधील मुलींचे VIDEO केले रेकॉर्ड!

अश्लील व्हिडिओ पाहण्याचे लागले व्यसन, विद्यार्थ्याने टॉयलेटमधील मुलींचे VIDEO केले रेकॉर्ड!

Next

बंगळुरू : बंगळुरूमधील एका विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे इतके व्यसन लागले की, तो कॅम्पसमधील मुलींच्या टॉयलेटमध्ये डोकावून मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. मात्र, या आरोपीला एकेदिवशी रंगेहात पकडण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ही घटना दक्षिण बंगळुरूच्या होसाकेरेहल्ली येथील एका खासगी महाविद्यालयातील आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी शुभमला सोमवारी गिरीनगर पोलीस दाखल करण्यात आले. यावेळी त्याने कबुली दिली की, तो टॉयलेटमधील मुलींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करू इच्छित होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याचा फोन आणि लॅपटॉप अश्लील व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेला होता. त्याला असे आणखी व्हिडिओ पहायचे होते. जेव्हा त्याला असे व्हिडिओ किंवा फोटो सापडत नाहीत, तेव्हा त्याने टॉयलेटमधील मुलींचे व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड करण्याचे ठरविले.

दरम्यान, मुलींचे व्हिडिओ बनवताना शुभम पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका सूत्राने सांगितले की, कॉलेज व्यवस्थापनाने त्याला 13 नोव्हेंबर रोजी पकडले, परंतु त्याने पुन्हा असे कधीही करणार नाही, असे वचन दिल्यानंतर त्याला चेतावणी देऊन सोडून दिले होते. त्यावेळी कॉलेज व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई केली नाही किंवा पोलिसांत तक्रारही केली नाही. यावेळी 19 नोव्हेंबर रोजी एका मुलीने शुभमला हे कृत्य करताना पकडले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. शुभमने त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, पोलीस या प्रकरणी शुभमकडून अधिक माहिती काढण्यात व्यस्त आहेत.

Web Title: obsessed with adult video a college student films girls in toilets bengaluru, crime news 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.