पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या, मग पत्नीचे दागिने गहाण ठेवून घेतलं लोन आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 01:31 PM2021-11-04T13:31:47+5:302021-11-04T13:32:24+5:30

Odisha Crime News : आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो एका मॉलमध्ये नोकरी करत होता पण लॉकडाऊन दरम्यान त्याची नोकरी गेली होती.

Odisha Crime News : Man detained over alleged murder wife and son in Bhubaneswar | पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या, मग पत्नीचे दागिने गहाण ठेवून घेतलं लोन आणि...

पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या, मग पत्नीचे दागिने गहाण ठेवून घेतलं लोन आणि...

Next

ओडिशाची (Odisha Crime News)  राजधानी भुवनेश्वरमध्ये डबल मर्डरची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या १० वर्षीय मुलाची आणि पत्नीची  गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. 

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो एका मॉलमध्ये नोकरी करत होता पण लॉकडाऊन दरम्यान त्याची नोकरी गेली होती. यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. पण त्याला नोकरी लागली नाही. नंतर त्याने पत्नीचे दागिने गहाण ठेवून लोन घेतलं आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये लावले. ४० वर्षीय आरोपी अबंदी बिजयने सांगितलं की, त्याने त्याची वडीलोपार्जित जमिनही विकली आहे. शेअऱ बाजारमध्ये झालेल्या नुकसानामुळे  त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. 

त्यासोबतच त्याने काही नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे उधार घेतले. पण तो ते पैसे परत देऊ शकत नाही. लोक त्याला पैशासाठी सतत फोन करतात. यामुळे तो डिप्रेशनमध्ये राहत होता. २ नोव्हेंबरच्या रात्री त्याने उशीने पत्नी आणि मुलाचं तोंड दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आपलं मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना याची खबर लागली तर तो पत्नीचे काही राहिलेले दागिने घेऊन पळून गेला.

याप्रकरणी माहिती देताना भुवनेश्वर डीएसपी उमाशंकर दास म्हणाले की, आरोपीने अनेकांकडून भरपूर पैसे उधार घेतले होते. त्याच्याकडे नोकरीही नव्हती. ज्यामुळे तो लोकांचे पैसेही परत देऊ शकत नव्हता. हत्येनंतर तो आपल्या पत्नीचे दागिने घेऊन फरार झाला आणि ते गहाण ठेवून पैसे घेतले. पण तो पोलिसांपासून वाचू शकला नाही. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Odisha Crime News : Man detained over alleged murder wife and son in Bhubaneswar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.