Odisha Conman: एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:14 PM2023-04-05T16:14:17+5:302023-04-05T16:15:06+5:30

अंमलबजावणी संचालनालयाने 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करणाऱ्या कॉनमॅनला ताब्यात घेतले आहे. जाणून घ्या त्याचे कारनामे...

odisha-news-ED-arrested-a-conman-for-marrying-27-women-and-fraud-cases | Odisha Conman: एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक...

Odisha Conman: एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक...

googlenewsNext


Odisha Conman News: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओडिशा राज्यातून मोठ्या कॉनमॅनला(फसवणूक करणारा) अटक केली आहे. रमेश स्वेन उर्फ ​​बिभू प्रकाश स्वेन नावाच्या या व्यक्तीचे कृत्य ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्याल. या मास्टरमाइंडला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीवर 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीचा इतिहास तपासला असता आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत.

फसवणुकीचे इतर गुन्हे
मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने हैदराबादमधील लोकांकडून 2 कोटींहून अधिक रुपये उकळल्याप्रकरणी स्वेनला 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. एवढेच नाही तर याआधी 2006 मध्ये त्याने 128 बनावट क्रेडिट कार्डद्वारे केरळमधील 13 बँकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणामध्येही त्याला अटक करण्यात आली.

8 महिन्यांपासून पोलिसांच्या देखरेखीखाली होता
ओडिशा पोलिसांचे एक पथक आठ महिन्यांपासून स्वेनवर लक्ष ठेवून होते. यानंतर पोलिसांनी त्याला 13 फेब्रुवारीला पकडले. मे 2021 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या स्वेनच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. या महिलेने 2018 मध्ये स्वेनसोबत लग्न केले होते. पोलिसांनी सांगितले की, स्वेनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. तीनही अपार्टमेंटमध्ये त्याने आपल्या तीन बायका ठेवल्या. 

सुक्षित महिलांची फसवणूक
स्वेनने ITBP असिस्टंट कमांडंट, आसाममधील डॉक्टर, छत्तीसगडमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाची वकील,
केरळ प्रशासकीय सेवा अधिकारी अशा मोठ-मोठ्या पदांवरील महिलांची फसवणूक केली आहे. स्वेनच्या पत्नींनी सांगितले की, तो त्यांच्याकडून पैसे उधार घ्यायचा आणि नंतर नवीन महिला शोधून तिच्याशी लग्न करायचा.

फसवणुकीत कुटुंबीयांचाही सहभाग 
पोलिसांनी स्वेनची पत्नी डॉ. कमला सेठी आणि तिची सावत्र बहीण आणि ड्रायव्हर यांना फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. आता ईडी 66 वर्षीय स्वेनच्या संदर्भात ओडिशा पोलिसांच्या संपर्कात आहे आणि त्याने केलेल्या फसवणुकीची चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: odisha-news-ED-arrested-a-conman-for-marrying-27-women-and-fraud-cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.