मालमत्तेच्या लालसेपोटी लहान भाऊच बनला वैरी! घरातच कुटुंबातील ४ जणांची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:55 AM2023-05-24T08:55:58+5:302023-05-24T08:57:25+5:30

ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

odisha relative killed four member of his own family in property dispute bargarh district | मालमत्तेच्या लालसेपोटी लहान भाऊच बनला वैरी! घरातच कुटुंबातील ४ जणांची केली हत्या

मालमत्तेच्या लालसेपोटी लहान भाऊच बनला वैरी! घरातच कुटुंबातील ४ जणांची केली हत्या

googlenewsNext

ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. ही घटना सोमवारी रात्री भाटली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिकझिकी गावात घडली. सिबाबाग नावाच्या माणसाने आपल्या मोठ्या भावाच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी हत्याराने वार केले.

ॲड. चव्हाणचे कारनामे ‘सीबीआय’ खोदणार! खंडणी प्रकरणासह दोन गुन्ह्यांचा तपास वर्ग 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गुरुदेव बाग (४६), त्यांची पत्नी सिबगरी (३५) आणि त्यांची मुले चुडामाई (१५) आणि श्रावणी (१०) अशी मृतांची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण मालमत्तेच्या वादाचे असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. ज्या खोलीत रक्ताने माखलेले मृतदेह सापडले होते ती खोलीही पोलिसांनी सील केली असून पुढील तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

ओडिशामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी शिकारींनी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात एका सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिमल कुमार जेना आणि इतर पाच वनरक्षक सोमवारी संध्याकाळी गस्तीवर असताना त्यांना ३० हून अधिक शिकारी दिसले, ज्यांनी सिमलीपाल दक्षिण रेंजमधील बोअन्सखलजवळ एका हरणाचा मृतदेह पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: odisha relative killed four member of his own family in property dispute bargarh district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.