आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर, आमरावतीमध्ये दोघांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: May 15, 2023 11:01 PM2023-05-15T23:01:44+5:302023-05-15T23:01:57+5:30

प्रत्यक्षात तो व्हिडीओ अमरावतीचा नसून तो येथील असल्याची अफवा पसरविली.

Offensive video sharing, case filed against two in Amravati police station | आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर, आमरावतीमध्ये दोघांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा

आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर, आमरावतीमध्ये दोघांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा

googlenewsNext

अमरावती: दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी मधुकर उमेकर (रा. राधानगर) व गोपाल गुप्ता (रा. बजरंग टेकडी) यांच्याविरूध्द गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

मधुकर उमेकर यांनी त्यांच्या वनारसी ग्रुपवर तो २६ सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला. तो व्हिडीओ आपल्याला गोपाल गुप्ता यांनी पाठविल्याचे उमेकर यांनी चौकशीदरम्यान सांगितले. विशेष म्हणजे तो व्हिडीओ अमरावतीचा आहे, असे म्हणून तो व्हायरल करण्यात आला. प्रत्यक्षात तो व्हिडीओ अमरावतीचा नसून तो येथील असल्याची अफवा पसरविली. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन अमरावती शहरात दंगली होऊ शकतात, याची जाणीव असताना देखील तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप उमेकर व गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी १४ मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Offensive video sharing, case filed against two in Amravati police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.