अरे देवा! गेली १४ वर्ष मुख्याध्यापक करत होता विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, म्हणून गावकऱ्यांनी ठेवले तोंड बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:44 PM2022-03-09T20:44:31+5:302022-03-09T20:45:46+5:30
Sexual Abuse Case : १५ फेब्रुवारीला तीन विद्यार्थिनींचे १९८ फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ५४ वर्षीय मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.
अरे देवा! गेली १४ वर्ष मुख्याध्यापक करत होता विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, म्हणून गावकऱ्यांनी ठेवले तोंड बंद
एका मुख्यध्यापक आणि शाळेच्या मालकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आणि ते पळून गेल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील नांगलमध्ये उघडकीस आली. गेली १४ वर्ष हा नराधम मुख्याध्यापक लैंगिक अत्याचार करत होता. अजून धक्कादायक बाब म्हणजे पीडित आणि गावकरी यांनी लज्जेखातर आणि मुख्यध्यापकावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे त्यांनी हे प्रकरण लपवून ठेवले. १५ फेब्रुवारीला तीन विद्यार्थिनींचे १९८ फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ५४ वर्षीय मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. महत्वाचे म्हणजे ही शाळा पंजाब राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असून शाळेला सरकारी निधी मिळतो.
आता हे प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. मुख्याध्यापकाने हे फोटो आपल्या संगणकावरून काढल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणाबाबत आता एक माजी विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी पुढे आला आहे. पंजाब विधानसभेचे आउटगोइंग स्पीकर आणि आनंदपूर साहिब येथून तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार राणा के पी सिंग यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा मुख्याध्यापकाने केला होता. मात्र,त्यांनी या मुख्याध्यापकाशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले स्पष्ट करत चौकशीची मागणी केली आहे. राणा म्हणाले, मुख्याध्यापकावर आरोप घेऊन कोणत्याही गावकऱ्याने माझ्याकडे कधीही संपर्क साधला नाही. पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आणि मला आशा आहे की त्याला आता शिक्षा मिळेल.
पंचायत सदस्याच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याचे आम्हाला समजले, परंतु आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र विद्यार्थींही कधीही तक्रार केली नाही. पीडित आणि गावकरी यांनी लाजेखातर आणि त्यांच्यावर असलेल्या राजकीय प्रभावाच्या भीतीपोटी हे प्रकरण लपवून ठेवले होते. मात्र, आता आरोपी मुख्यध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.