महामार्गांवर ऑइलचा सडा, अनेक दुचाकींना अपघात; टोल कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:49 PM2022-03-15T18:49:19+5:302022-03-15T18:50:23+5:30

Accident : राष्ट्रीय  महामार्ग असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे (इगतपुरी) या किलोमीटरदरम्यांची दुरुस्ती देखभालचा ठेका महामार्ग प्राधिकरणने पिक इन्फ्रासह अन्य एका कंपनीस दिला आहे.

Oil spills on highways, many bike accidents | महामार्गांवर ऑइलचा सडा, अनेक दुचाकींना अपघात; टोल कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष

महामार्गांवर ऑइलचा सडा, अनेक दुचाकींना अपघात; टोल कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष

googlenewsNext

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक महामार्ग सद्या जिकरीचा ठरत आहे ,तुटलेले संरक्षक कथडे, थीगळ (प्याच) लावलेले रस्ते, नगमोडी वळणे असलेल्या कसारा घाटात अपघातांची सख्या दिवसागणिक वाढत आहे.

राष्ट्रीय  महामार्ग असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे (इगतपुरी) या किलोमीटरदरम्यांची दुरुस्ती देखभालचा ठेका महामार्ग प्राधिकरणने पिक इन्फ्रासह अन्य एका कंपनीस दिला आहे. महामार्गांवरील आपघात ग्रस्तांना मदत करणे, महामार्गांवरील खड्डे, दुरुस्ती यासह महामार्गांवर ऑइल वैगरे सांडल्यास त्यावर उपाय योजना करणे, प्रवाशांच्या सुरक्षेचेची काळजी घेणे यासह अनेक कामे या ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहेत. या कामाच्या मोबदल्यात वाहतूकदारांकडून टोल घेतला जात आहे. परंतु टोल कंपनीकडून कुठल्याही प्रकारची मदत वाहनचालक ,वाहतूकदार प्रवाशाना होत नाही.

आज सकाळी जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याच्या वळणावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऑइल सांडले होते. 400 ते 500 मिटर अंतरावर ऑइल सांडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकींचा आपघात झाले मोठ्या वाहणासह तब्बल 15 ते 20 दुचाकी या ऑइलवरून स्लीप होऊन अपघात झाले. या प्रकरणी महामार्ग पोलीस घोटी केंद्रच्या अधिकाऱ्यांनी टोल कंपनी च्या यंत्रणेस माहिती दिली. परंतु त्या ऑइलवर माती टाकून पाणी मारण्यासाठी टोल कंपनीकडून कुठलीही मदत घाटात उपलब्ध झाली नाही. अखेर महामार्ग पोलिसांनी माती टाकून 400 मिटर चा रस्ता सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला तब्बल 2 तास महामार्ग पोलीस भर उन्हात रस्त्यावर माती टाकण्याचे काम करीत होते.

ते आले त्यांनी पाहिले व फोटो काढून निघून गेले..

दरम्यान महामार्गांवर कसारा घाटात मोठ्या प्रमाणात ऑइल साडले असल्याची  माहिती पिक इन्फ्रा,(mnal) चे प्रोजेक्ट मॅनेजर सिंग यांना पोलिसांनी दिली होती. परंतु सिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष करित फोन बंद केला काही तासांनी टोल नाक्यावरील रूट पेट्रोलिंगची गाडी ऑइल पडलेल्या ठिकाणी आली. पण तिथे उपाययोजना न करता फोटो काढून निघून गेली .असाच प्रकार 12 मार्च च्या रात्री केला महामार्गांवरील कसारा उबरमाळी दरम्यान धावत्या कटेनर व दुचाकी ला आपघात झाला व आग लागली. त्यादरम्यान टोलच्या पेट्रोलिंग टीम च्या कर्मचाऱ्यांनी तब्ब्ल तासभर विडिओ शूटिंग करीत वेळ वया घालवला या दरम्यान 5 तासानंतर देखील टोल प्रशासनाची मदत मिळाली नाही. 

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 असलेल्या या मुबई नाशिक महामार्गांवर प्रवाशाची सुरक्षा वाऱ्यावर असून स्थानिक खासदार, लोकप्रतिनिधी या ठेकेदारांना व टोल प्रशासनास पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

 

कसऱ्याहून इगतपुरी कडे जात असताना जुन्या घाटात मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते व त्या ऑइल मुळे माझ्या सह अनेक दुचाकी स्लीप झाल्या.व आम्हला दुखपत झाली............संदीप वाघ, दुचाकी चालक

 

कसारा घाटातील आपघात असो ,ऑइल पडल्याच्या,आग लागल्याच्या घटना असो   की अन्य काही अपत्ती या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,किंवा टोल यंत्रणा यांची काडीमात्र मदत आम्हा वाहतूक दारांना मिळत नाही........सुनील कनकोसे, वाहतूकदार (शहपुर- नाशिक डेली प्रवास)

Web Title: Oil spills on highways, many bike accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.