Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:08 PM2022-11-14T16:08:56+5:302022-11-14T16:09:17+5:30

Ola Scooter Fraud : या घोटाळ्यातून एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे.

ola electric scooter scam delhi police arrested 20-peoples | Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

googlenewsNext

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याप्रकरणी (Ola Electric Scooter Scam) दिल्ली पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी हे आरोपी बनावट वेबसाइट (Fake Website) तयार करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. 

या घोटाळ्यातून एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. रिपोर्टनुसार, अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी ग्राहकांना सेवा दिली नाही. 5 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या बाह्य उत्तर जिल्ह्याचे पोलीस पाटणा, गुरुग्राम आणि बंगळुरूमध्ये छापे टाकत आहेत. येथे आरोपींनी आपले कार्यालय सुरू केले होते.

ओला इलेक्ट्रिकने वर्षभरापूर्वीच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. स्कूटर आपल्या फीचर्समुळे आणि अत्यंत कमी बुकिंग रकमेमुळे खूप लोकप्रिय झाली. मात्र, सायबर गुन्हेगारांना स्कूटरच्या नावावरही फसवणूक करण्याचा नवा मार्ग सापडला आहे. या स्कूटरच्या लाँचिंगवेळी तुम्ही फक्त 499 रुपयांमध्ये बुक करू शकत होता. मात्र, सध्या बुकिंगची रक्कम 999 रुपयांवर गेली आहे.

आतापर्यंत तीन स्कूटर लाँच
ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात तीन वेगवेगळ्या स्कूटर लाँच केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महाग स्कूटर OLA S1 Pro आहे, ज्याची किंमत 1,39,999 रुपये आहे. दुसरी स्कूटर OLA S1 Pro आहे, ज्याची किंमत 99,999 रुपये आहे. या स्कूटर यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आल्या. तर तिसरी स्कूटर नुकतीच लाँच झालेली Ola S1 Air आहे. या स्कूटरची किंमत 84,999 रुपये आहे.

Web Title: ola electric scooter scam delhi police arrested 20-peoples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.