ओला, उबर चालकांचा मोर्चा पोलिसांनी भारतमाताकडेच गुंडाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:15 PM2018-11-19T16:15:23+5:302018-11-19T16:16:48+5:30
भारतमाता सिग्नलजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाला होता. तसेच मोर्चेकरांना पोलीस रोखत होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती.
मुंबई - ओला व उबर चालकांकडून भारतमाता ते विधानभवनापर्यंत काढण्यात येणारा मोर्चा भोईवाडा पोलिसांनी लालबागमध्ये भारतमातासमोर रोखला. हा मोर्चा सकाळी १० वाजता भारतमाता येथून निघणार होता. परंतु, पोलिसांनी मोर्चा निघण्याआधीच मोर्चेकरांना ताब्यात घेतले. कारण भोईवाडा पोलिसांकडून लागणारी परवानगी या मोर्चेकरांनी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मोर्चेकरांना गाडीत भरून आझाद मैदानावर नेले.
भारतमाता सिग्नलजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाला होता. तसेच मोर्चेकरांना पोलीस रोखत होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती.
ओला-उबर चालक मंत्रालयावर धडकणार!; वाहतूक पोलिसांनी रोखल्यास पायी जाणार