धक्कादायक! 'मोदी चाय' विकणाऱ्या वृद्धाचा निर्घृण खून, पंतप्रधानांकडून प्रेरणा घेऊन सुरू केलं होतं हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:22 PM2021-07-21T15:22:47+5:302021-07-21T15:28:57+5:30
Kanpur Murder: या हत्येमागचं कारण समजू शकलं नाही.
कापनूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन चहाचं हॉटेल सुरू करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. कानपूरच्या घाटमपूरमध्ये हा वृद्ध 'मोदी चाय' नावानं छोटंस हॉटेल चालवायचा. दरम्यान, या हत्येमागचं कारण समजू शकलं नाहीये. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कानपूरमधील घाटमपूरच्या हजांबाड रोडवर बलराम चसान नावाच्या वृद्धाचं हॉटेलं होतं. बलराम यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी आपल्या हॉटेलंच नाव 'मोदी चाय' असं ठेवलं होतं. बलराम हॉटेल चालवण्यासह भाजपाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गाणे गायचे.
घटनेच्या दिवशी ते त्यांच्या हॉटेलजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये गेले होते. त्या ठिकाणी रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम झाल्यानंतर ते रात्री उशीरा आपल्या दुकानाबाहेरच झोपी गेले. पण, सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, बलराम यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तसेच, त्यांचे दोन्ही डोळेही फोडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.