धक्कादायक! पत्नीची हत्या करत वृद्ध व्यावसायिकाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 01:05 PM2019-10-12T13:05:23+5:302019-10-12T13:08:26+5:30

गिरगाव येथील घटना

Old aged businessman committed suicide by killing his wife | धक्कादायक! पत्नीची हत्या करत वृद्ध व्यावसायिकाने केली आत्महत्या

धक्कादायक! पत्नीची हत्या करत वृद्ध व्यावसायिकाने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देघरगुती भांडणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.लक्ष्मीनाथ मखीजा (६०) हे पत्नी कविता (५५)सोबत गिरगाव येथील महेंद्र मॅन्शनमधील टू बीएचके फ्लॅटमध्ये राहायचे.

मुंबई  - एका व्यावसायिक वृद्धाने पत्नीची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी एल. टी. मार्ग परिसरात घडली. पोलिसांनी वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.

लक्ष्मीनाथ मखीजा (६०) हे पत्नी कविता (५५)सोबत गिरगाव येथील महेंद्र मॅन्शनमधील टू बीएचके फ्लॅटमध्ये राहायचे. त्यांचा मोठा भाऊदेखील त्यांच्यासोबत राहण्यास आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात एकाने आत्महत्या केल्याचा कॉल आला. घटनेची वर्दी लागताच एल. टी. मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. स्थानिक दुकानदाराने याबाबत पोलिसांना कळविले होते. त्यानुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्यांच्या घरी धाव घेतली. घर बंद होते. याबाबत त्यांची मुलगी दीपाला कळविण्यात आले. ती खासगी कंपनीत नोकरीला आहे.

तिला याबाबत समजताच ती घरी आली. तिच्याकडील चावीने घराचा दरवाजा उघडला असता कविता या रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्या. त्यांच्या अंगावर सात वार करण्यात आले होते. लक्ष्मीनाथ मखीजा यांनी पत्नी कविताची हत्या करत घराच्या खिडकीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे चौकशीत समोर आले. एल. टी. मार्ग पोलिसांनी मुलगी दीपाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, मखीजा बंधूंचे चेंबूर परिसरात दुकान आहे. आनंद हे मोठे भाऊ असून त्यांची पत्नीदेखील दुकानात असते आणि संध्याकाळच्या सुमारास घरी परतते. गेल्या पाच वर्षांपासून कविता यांना अस्थमा होता. लठ्ठपणामुळे त्या चालू शकत नव्हत्या. घरगुती भांडणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Old aged businessman committed suicide by killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.