न्याय मिळाला! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृध्दाला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 09:10 PM2020-08-10T21:10:04+5:302020-08-10T21:10:27+5:30
न्यायालय : आरोपीला व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे केले हजर
जळगाव : शौचास गेलेल्या ११ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर निर्जनस्थळी बलात्कार केल्याच्या प्रकरणात तुकाराम रंगनाथ रंगमले (६०,रा.नशिराबाद, ता.जळगाव) याला दोषी धरुन न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
तालुक्यातील नशिराबाद येथे १३ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ४ वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात बलात्कार व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती तपासाधिकारी आर.टी.धारबळे यांनी आरोपीला १४ रोजी अटक केली होती. त्यानंतर पीडितेचा वयाचा दाखला व इतर पुरावे गोळा केले. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांची पदोन्नतीने बदली झाल्यानंतर सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन ९ आॅक्टोबर २०१८ रोजी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहात
गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आरोपी हा जळगाव कारागृहात आहे. सोमवारी आरोपी रंगमले याला कारागृहातून व्हीडीओकॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्या. लाडेकर यांनी त्याला दोषी धरले असता आपल्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती त्याने न्यायालयाला केली, मात्र जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी त्यावर जोरदार हरकत घेवून पीडितेचे वय, आरोपीचे वय व त्याने केलेला घृणास्पद प्रकार पाहता त्याला कोणतीही दया दाखवू नये व जन्मठेपेची शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पीडिता, पीडितेचे वडील, सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, सचिन बागुल, पंच नरेंद्र साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना तपासण्यात आले. पीडिता, चेतन धनगर व वैद्यकिय अधिकाºयाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर आरोपीतर्फे अॅड.संतोष सांगोळकर यांनी काम पाहिले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू