अंगावरील दागिनेच उठले जिवावर!, सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून

By संदीप वानखेडे | Published: July 5, 2023 05:12 PM2023-07-05T17:12:11+5:302023-07-05T17:18:11+5:30

सुलतानपूर येथील घटना

Old woman murdered while robbers looted golden ornaments | अंगावरील दागिनेच उठले जिवावर!, सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून

अंगावरील दागिनेच उठले जिवावर!, सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून

googlenewsNext

संदीप वानखडे, सुलतानपूर (जि. बुलढाणा): अंगावरील दागदागिन्यांच्या हव्यासापोटी सुलतानपूर येथील ८५ वर्षीय वृद्धेचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे. चंद्रभागा पाराजी सुरुशे असे मृत वृद्धेचे नाव आहे.लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील बांडा शेतशिवारात दत्तात्रय पिराजी सुरुशे आपल्या पत्नी व आईसह शेतात असलेल्या घरात राहतात. ४ जुलै राेजी ते सुलतानपूर येथील बाजाराचा दिवस असल्याने ते शेतात उशिराने गेले. दरम्यान, परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या शेजारच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करीत असलेल्या आरोपी प्रल्हाद पानझडे याने पाळत ठेवून घरात एकट्या असलेल्या चंद्रभागा पाराजी सुरुशे वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने हिसकावून घेतली, तसेच वृद्धेची हत्या करून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगावर ब्लँकेट जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मृत वृद्धेचा मुलगा दत्तात्रय पाराजी सुरुशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आरोपी मारोती प्रल्हाद पानझडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत. तसेच उपपोलिस निरीक्षक अमर नागरे , जायभाये , पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर कोरडे, सुरेश काळे, कॉन्स्टेबल राजेश जाधव, खालीद खान, मोहम्मद परसुवाले सहकार्य करीत आहे.

आराेपी सराईत गुन्हेगार

वृद्धेची हत्या करणारा आराेपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच ताे गत काही महिन्यांपासून वृद्धेच्या शेजारी असलेल्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत हाेते. पेालिसांनी आराेपीस अटक केली आहे.

Web Title: Old woman murdered while robbers looted golden ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.