ओमायक्रोनच्या रुग्णांनी केले भारतभर देवदर्शन; शेकडो जणांना दिला प्रसाद, दोघाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:39 PM2022-01-07T20:39:00+5:302022-01-07T20:39:46+5:30

Crime News : उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार 

Omaicron patients performed Devdarshan all over India, gave Prasad to hundreds of people, filed a case against both of them | ओमायक्रोनच्या रुग्णांनी केले भारतभर देवदर्शन; शेकडो जणांना दिला प्रसाद, दोघाविरोधात गुन्हा दाखल

ओमायक्रोनच्या रुग्णांनी केले भारतभर देवदर्शन; शेकडो जणांना दिला प्रसाद, दोघाविरोधात गुन्हा दाखल

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : केनियावरून वरून परतलेल्या चौघांपैकी तिघांना ओमायक्रोन झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी दोघेजण विलगिकरणात असताना देवदर्शन यात्रा करून आले. यात्रे दरम्यान त्यांनी शेकडो जणांना ओमायक्रोनचा प्रसाद दिला असून या कृत्या बाबत महापालिकेने त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे कल्याणी कुटुंबातील चौघेजण १७ डिसेंबर रोजी केनियातून परत आले. महापालिका आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर, २१ डिसेंबर रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यांची आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट येईपर्यंत त्यांना घरातच विलगिकरणात राहण्यास बजाविले. मात्र कुटुंबांनी महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून देवदर्शन व सहलीसाठी काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे गेले. दरम्यान ४ पैकी तिघांचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शहरात ओमायक्रोन रुग्ण आढळल्याने, महापालिका आरोग्य विभागाचे पथक कल्याणी यांच्या घरी त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी गेलेअसता, कुटुंब सहलीसाठी गेल्याचे उघड झाले. महापालिका आरोग्य यंत्रणेला धक्का बसला असून ओमायक्रोन पॉसिटीव्ह रुग्णांनी प्रवास दरम्यान किती जणांना प्रसाद दिला?. असा प्रश्नचिन्हे उभा ठाकला आहे.

 महापालिका आरोग्य विभागाने, कल्याणी कुटुंबाला मोबाईल फोन करून, जेथे आहे तेथेच क्वॉरंटाईन होण्यास सांगितले. मात्र हे कुटुंब सर्वत्र फिरत होते. ३१ डिसेंबर राजी कुटुंब उल्हासनगरला आल्यानंतर, कोरोना आणि ओमायक्रोन रोगाच्या नियम व अटीचा भंग केल्याचा ठपका महापालिका आरोग्य विभागाने ठेवला. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या आदेशानंतर प्रभाग समिती क्रं-३ चे सहायक आयुक अजित गोवारी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी कल्याणी कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर सुरवातीला रुग्णालयात तर आता घरी उपचार करण्यात येत आहे.

Web Title: Omaicron patients performed Devdarshan all over India, gave Prasad to hundreds of people, filed a case against both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.