बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 05:00 PM2020-07-19T17:00:33+5:302020-07-19T17:02:07+5:30
अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते.
मुंबई : आयकर विभागाच्या दावे निकाली काढणाऱ्या न्यायालयाने आज 196 कोटींचे काळे धन स्विस बँकेत लपविल्याप्रकरणी महत्वाचा निर्णय दिला आहे. ITAT ने 80 वर्षांच्या महिला खातेधारकाला या काळ्या पैशांवर कर देण्यासोबत दंडही ठोठावला आहे. धक्कादयाक म्हणजे या महिलेचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये होते. तरीही तिच्या नावावर 196 कोटी रुपयांचे काळे धन समोर आले होते.
रेणू थरानी असे या महिलेचे नाव आहे. ती थरानी फॅमिली ट्रस्टच्या नावे असलेल्या स्विस बँकेतील खात्याची एकमेव लाभार्थी आहे. हे खाते 2004 मध्ये जीडब्ल्यू इन्वेस्टमेंट्स या नावे उघडण्यात आले होते. या खात्यातून फॅमिली ट्रस्टला पैसे वळते करण्यात आले होते. थरानी यांनी अनिवासी असून परदेशात कोणतेही खाते नसल्याचे म्हटले होते. अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते. तिच्या नावे 4 कोटी डॉलरची रक्कम होती. तेव्हाच्या चलनानुसार ती 196 कोटी रुपये होते. 2014 मध्ये थरानी यांनी नोटिस पाठविण्यात आली.
ITAT ने आज या प्रकरणी निकाल दिला असून यामध्ये त्यांनी थरानी यांच्याकडे एवढा पैसा आहे जो त्यांच्या उत्पन्नानुसार कमवायला 13 हजार 500 वर्षे लागली असावीत. थरानी या काही मदर तेरेसा नाहीत की त्यांच्या खात्यावर कोणीही 4 कोटी डॉलर जमा करतील. जिथे जीडब्ल्यू इन्वेस्टमेंट्सची स्थापना झाली आहे ते कॅमेन बेट काही समाजोपयोगी कामांसाठीही ओळखले जात नाही. थरानी यांनी कन्सेंट वेव्हर फॉर्मवरही सही केलेली नाही. यामुळे आयकर विभागाचा आक्षेप हा जास्त मजबूत आहे. यामुळे आयकर विभाग परदेशी बँकांकडून माहिती मागवू शकतो. तसेच यामुळे थरानी या देखील याला नकार देऊ शकणार नाहीत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर
चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच
आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये मोठे बदल; करदात्यांनो जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...