बापरे! तरुणींना त्यांचे अश्लिल व्हिडीओ दाखवून मैत्रिणींना बोलवण्यास भाग पाडायचे, त्यांच्यावरही बलात्कार करायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 08:57 PM2023-05-14T20:57:36+5:302023-05-14T20:58:11+5:30

फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅटद्वारे हे तिघे मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होते. तिला एकांतात घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे व्हिडीओ काढत होते.

OMG horrible! youth's forced on Young women to invite their friends by showing them pornographic videos and raped them | बापरे! तरुणींना त्यांचे अश्लिल व्हिडीओ दाखवून मैत्रिणींना बोलवण्यास भाग पाडायचे, त्यांच्यावरही बलात्कार करायचे

बापरे! तरुणींना त्यांचे अश्लिल व्हिडीओ दाखवून मैत्रिणींना बोलवण्यास भाग पाडायचे, त्यांच्यावरही बलात्कार करायचे

googlenewsNext

सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबतची मैत्री किती खतरनाक असेल याचा विचारही करण्याची हिंमत होणार नाही अशी घटना घडली आहे. एका तरुणीला आपला बाहुपाशात अडकविल्यानंतर तिचा व्हिडीओ काढून तिच्या मैत्रिणींना देखील ब्लॅकमेल करत त्यांनाही वासनेचा बळी बनविणारा प्रकार घडला आहे. श्रीमंत घरातील तीन जण हे कृत्य करत होते. 

फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅटद्वारे हे तिघे मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होते. तिला एकांतात घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे व्हिडीओ काढत होते. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनाही ते लक्ष्य करत होते. पहिलीचा व्हिडीओ दाखवून तिच्या मैत्रिणींना ब्लॅकमेल करून बोलवून घेत असत. यानंतर त्यांच्यावरही अत्याचार करत असत. यानंतर त्यांचाही व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केले जायचे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील सुखानंद गावातील ही घटना समोर आली आहे. 

एका पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेले कृत्य तिच्या मैत्रिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून पीडितेने एका आरोपीला बोलावले. यानंतर त्याला ओळखीच्या लोकांकडून घेरून त्याचा फोन काढून घेतला आणि पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी त्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी गडगंड श्रीमंत कुटुंबातील आहेत. हरमेल सिंग, मनमिंदर सिंग आणि हरफुल सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनुसार सर्व आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. सोशल मीडियावर मैत्री करून हे आरोपी तरुणींना अडकवत होते. व्हिडीओ बनविल्यानंतर ते या तरुणींना त्यांच्या मैत्रिणींना देखील बोलविण्यास भाग पाडत होते. असे न केल्यास ते व्हिडीओ व्हाय़रल करण्याची धमकी देत असत.
जेव्हा पीडित तरुणी घाबरून तिच्या मैत्रिणींना देखील त्यांच्याकडे नेत असायची तेव्हा ते तिच्यावरही बलात्कार करायचे. ही त्यांची चेन सुरुच असायची, असे डीएसपींनी सांगितले. 

Web Title: OMG horrible! youth's forced on Young women to invite their friends by showing them pornographic videos and raped them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.