हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:55 PM2020-07-11T18:55:15+5:302020-07-14T20:45:41+5:30

कमलचे वडील हे बँकेत कर्मचारी होते. यामुळे कलमचे बँकेत नेहमी येणेजाणे असायचे. यामुळे त्याला बँकेच्या कामकाजाची पुरेपूर माहिती होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई देखील निवृत्त झाली.

OMG! Not given a job after death of father; youth opened an branch of SBI | हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूमध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊनमध्ये ही बँक उघडण्यात आली होती. स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच हा प्रताप केला होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 


स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही ब्रँच पाहून आश्चर्यचकित झाले. कारण खऱ्या शाखेसारखी अगदी हुबेहूब ब्रांच बनविण्यात आली होती. एसबीआयच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबू याने हा प्रताप केला आहे. त्याने पनरुत्ती बाजार ब्रांचच्या नावे एक बनावट वेबसाईटही बनविली होती. पोलिसांनी कमलसोबत ए कुमार (42) आणि एम मणिकम यांनाही अटक केली आहे. 


या बोगस ब्रँचची पोलखोल तेव्हा झाली जेव्हा एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचबाबत त्या शहरातील दुसऱ्या एका ब्रांचमध्ये चौकशी केली. या ग्राहकाने या बनावट ब्रांचमध्ये मिळालेली पावती त्या बँकेत दाखविली. ही पावती पाहून मॅनेजरला धक्काच बसला. म्हणून त्यांनीच या बनावट ब्रांचला भेट दिली. आतमध्ये पाहताच त्यांनाही धक्का बसला. कारण तेथील सेटअप एसबीआयसारखाच होता. आता पोलिसांनी या तिघांविरोधात आयपीसी 473, 469, 484 आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


कमलचे वडील हे बँकेत कर्मचारी होते. यामुळे कलमचे बँकेत नेहमी येणेजाणे असायचे. यामुळे त्याला बँकेच्या कामकाजाची पुरेपूर माहिती होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई देखील निवृत्त झाली. वडिलांच्या निधनानंतर त्याने स्टेट बँकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, त्याला नोकरी मिळण्यास खूप उशिर झाल्याने त्याने आपलीच एक शाखा उघडली. कमलवर अद्याप फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याने त्याची आई आणि काकीच्या खात्यांवरून स्टेट बँकेचा खऱ्या खातेदारांना पैसे पाठविले आहेत. याचा तपास आता पोलीस करत आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच बोलती बंद

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

 

Web Title: OMG! Not given a job after death of father; youth opened an branch of SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.