ओमकार भागानगरे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी गणेश हूचे, नंदू बोराटेला पुण्यातून अटक
By अण्णा नवथर | Published: June 23, 2023 03:24 PM2023-06-23T15:24:44+5:302023-06-23T15:24:55+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: अवैध धंद्याच्या वादातून शहरातील बालिकाश्रम रोडवरील रोडवर झालेल्या ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेले मुख्य आरोपी गणेश हुचे व नंदू बोराटे ,या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.२३) पहाटे पुणे येथून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अवैध धंद्याच्या वादातून शहरातील बालिकाश्रम रोडवरील रुबाब कापड दुकानात समोर भर रस्त्यात ओमकार भागानगरे यांचा तलवारीने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना मदत करणाऱ्या तीन जणांना गुरुवारी अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे व नंदू बोराटे, संदीप गुडा हे तिघेजण घटनेनंतर काही तासातच नगरमधून फरार झाले होते .या तिघांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाले होते. या पथकाने छत्रपती संभाजीनगर ,नाशिक मुंबई, पुणे आदी ठिकाणी आरोपींचा शोध घेतला परंतु, ते मिळून आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने पुणे येथून मुख्य आरोपीचे व बोराटे या दोघांना अटक केली असून,त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.