अभिनेता सचिन जोशीला चार दिवस ईडी कोठडी, ओंकार ग्रुप घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:03 AM2021-02-16T03:03:32+5:302021-02-16T03:04:06+5:30
Omkar Group money laundering case: Sachin Joshi sent to ED custody till Feb 18 : सचिन गुटखा उत्पादक जे. एम. जोशींचा मुलगा आहे. हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार विजय मल्ल्याचा बंगला त्याने लिलावात घेतला.
मुंबई : शंभर कोटी गैरव्यवहारप्रकरणी अटक अभिनेता व उद्योगपती सचिन जोशीला सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) १८ फेब्रुवारीपर्यंत कोठडी मिळाली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
ओंकार बिल्डर्सने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) २२ हजार कोटींचा घोटाळा केला. त्यांच्याकडे सचिन जोशीने १०० कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याचे तपासातून पुढे आले. याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याची दोन दिवस कसून चौकशी केली. त्याच्याकडून तपासात सहकार्य करण्यात येत नव्हते. अखेर रविवारी रात्री त्याला अटक केली.
सचिन गुटखा उत्पादक जे. एम. जोशींचा मुलगा आहे. हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार विजय मल्ल्याचा बंगला त्याने लिलावात घेतला. व्यावसायिक पराग संघवीने ५८ कोटींची फसवणूक केल्याने त्याच्यावरऑक्टोबर २०२० मध्ये अंधेरी पोलिसांत तक्रार दाखल आहे.