हनिमूनच्या रात्री सापडला पत्नीच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं टाकलं 'हे' पुढचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:28 PM2022-03-11T21:28:46+5:302022-03-11T21:31:01+5:30
Rape Video Viral : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
पलवल - हरियाणातील पलवलमध्ये एका मुलीवर बलात्काराचा व्हिडिओ बनवून पतीला पाठवून लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
पोलीस तपास अधिकारी सुमित्रा यांनी सांगितले की, एका नवविवाहित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 6 मार्च रोजी तिचे लग्न फरीदाबाद येथील एका तरुणाशी झाले होते. लग्नाच्या रात्रीच सचिन नावाच्या तरुणाने बलात्काराच्या वेळी बनवलेला व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला होता. व्हिडिओ पाहून पतीने तिला आपली पत्नी मानण्यास नकार दिला आणि रागाच्या भरात तिला माहेरी सोडून आला.
ऑक्टोबरमध्ये बलात्कार झाला होता, पॉर्न व्हिडिओ बनवला होता
पीडितेचा आरोप आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये ती तिच्या मामाच्या घरी एकटी होती. त्याचवेळी सचिन अन्य दोन तरुणांसह त्यांच्या घरात घुसला. यावर तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड कापडाने बांधले व नंतर खोलीत नेऊन चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कारादरम्यान तिच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन्ही तरुणांनी तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि कुणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ इंटरनेटवर टाकला. यामुळे ती घाबरली आणि आरोपीने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. आरोपी सचिनचा भावोजी विवेक, बहीण करीना आणि काजल आणि आई उषा यांनीही तिला लग्न न करण्यास धमकावले, मात्र तिने नकार दिला. पीडितेचे इतरत्र लग्न झाल्यावर आरोपीने पहिल्या रात्रीच तिच्या पतीला बलात्काराचा व्हिडिओ पाठवला.
नवरा म्हणाला - आता काही संबंध ठेवायचे नाहीत
व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने आईवडिलांच्या घरी पत्नीला सोडून तिला आपलं मानण्यास नकार दिला. मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत, असे त्या तरुणाने सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.