"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:42 PM2023-11-06T12:42:07+5:302023-11-06T12:42:47+5:30

यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

On the first night of the wedding, all dreams were broken, the bride came out of the room | "ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्...

"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्...

उत्तर प्रदेशातील एटामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपण नपुंसक असल्याचे लपवून लग्न केले. मात्र, मधूचंद्राच्या रात्री खुलासा झाल्यानंतर, वधूचे स्वप्न क्षणात भंगले. वधू आरडा-ओरड करत रूममधून बाहेर आली. तिने कुटुंबातील लोकांना संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पतीसह तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एटा जिल्ह्यातील मिरहची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेने न्यायालयात केलेल्या अर्जानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात म्हणण्यात आले आहे की, "बुलंदशहरातील अहमदगड येथील एका तरुणासोबत 11 जून 2022 रोजी आपला विवाह झाला. यात 6 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले होते. वधू जेव्हा सासरी  पोहोचली, तेव्हा मधूचंद्राच्या रात्री, आपला पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आहे.

महत्वाचे म्हणजे, सासरच्या लोकांनी आपल्या घरच्यांना खोटी माहिती देऊन हे लग्न लावले, असा आरोप वधूने केला आहे. दरम्यान, आम्ही उपचार घेऊ आणि सर्व व्यवस्थित होईल, असे चिच्या पतीच्या घरच्यांनी म्हटले आहे. संबंधित महिलेने म्हटले आहे की, ती 2 महिन्यांनंतर आपल्या कुटुंबीयांसह पुन्हा एकदा सासरी जाऊन पतीला भेटली होती. मात्र, उपचारानंतरही कसल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. यावर, सासरच्यांकडे हुंडा आणि रोख देण्यात आलेले पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. यावर सासरच्या लोकांनी धमकी देत घरातून हकलून लावले. 

यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: On the first night of the wedding, all dreams were broken, the bride came out of the room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.