हनीमूनच्या रात्री पतीने केले दुष्कृत्य, खरा चेहरा समोर आल्यानंतर पत्नीने गाठलं पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:54 PM2022-03-06T20:54:59+5:302022-03-06T20:55:53+5:30
आग्रा येथील हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या पतीला शनिवारी अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. ...
आग्रा येथील हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या पतीला शनिवारी अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. त्याच्याविरोधात पत्नीसोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य, मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि खासगी संबंधांचे व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित पत्नीने सांगितलं की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीसोबत दुष्कृत्य केलं. त्याने अनेक वेळा तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर तिला त्रास दिला. अनेकवेळा बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले. यानंतर समोर आलं की, त्याचे लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. मात्र, पत्नीने विरोध केल्यानंतर सासू-सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. पीडिता हरीपर्वत भागातील शूज उद्योगपतीची मुलगी आहे.
आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले
तिचं लग्न 7 मे 2021 रोजी खंदारी भागातील शूज उद्योगपतीच्या मुलासोबत झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी केली. पत्नीने विरोध केला तर तो आक्रमक झाला. त्यामुळे ती देखील विरोध करू शकली नाही. यानंतरही अनेकदा त्याने पत्नीसोबत असेच दुष्कृत्य केले. सुरुवातील पती असं का वागतोय हेच तिच्या ध्यानात आलं नाही. यानंतर समोर आलं की, पतीचं लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. त्याबाबत काही फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅटमुळे हा खुलासा झाला.
खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला
पीडितेने असा आरोप केला आहे की, पतीने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक संबंध ठेवले. 9 डिसेंबर 2021 रोजी पतीच्या वाढदिवसाची पार्टी होती. यात तो खूप मद्यपान करून घरी आला होता. यानंतर त्याने तिच्यासोबत मारहाण केली. तर एकदा पतीने शरीरसंबंधादरम्यान तिचा व्हिडीओ शूट केला. जेव्हा तिला याबाबत कळलं त्यावेळी तिने व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. त्यावर तो पुन्हा मारहाण करू लागला. 1 डिसेंबर 2021 रोजी विरोध केला म्हणून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आदी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी पतीला बीएमडब्ल्यू कारसह अटक केली आहे.