लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 02:11 PM2023-06-03T14:11:50+5:302023-06-03T14:12:33+5:30

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले

On the very first night of marriage, the wife beatan husband at Hamirpur | लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

googlenewsNext

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं लग्न मंडपातून सात फेरे घेऊन सासरी पोहचलेल्या मुलीने असं कृत्य केले ज्याने संपूर्ण गावात लोक आश्चर्यचकीत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवरीच्या डोक्यावरील पदर काढला त्यामुळे संतापलेल्या नवरीने पतीच्या कानशिलात लगावली. नवरीने नवऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे कुटुंबाला धक्का बसला. 

नवरीकडून झालेल्या मारहाणीमुळे नवरा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्हीकडील मंडळी काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील सुरेश कुमार याचे लग्न इमिलिया गावातील मुलीशी झाले. नवरी असलेली संगीता या लग्नामुळे खुश नव्हती. मुलीकडच्या तिचे जबरदस्तीने लग्न लावले. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांनी नवऱ्याकडील सर्व पाहुणेमंडळींचे आदरतिथ्य केले. 

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले. यानंतर नवरा-नवरीने मिळून सात फेरे घेतले. लग्नानंतर वधूचा निरोप समारंभ पार पडला. सासरी येताच वराच्या घरी पूजा करून इतर विधी पूर्ण करण्यात आले, मात्र लग्नाच्या रात्री वधूने वराला अशी भेट दिली, ज्यामुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.

पदर हटवताच नवरीने नवऱ्याचा कानाखाली मारली
लग्न पार पडल्यानंतर सासरच्या घरी येताच नववधूचा पारा चढला. खोलीत वराच्या मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती. खोलीही चांगली सजवली होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वराने वधूच्या डोक्यावरील पदर काढताच तिला राग आला, तिने हनिमूनच्या बेडवर वराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात वराला दुखापत झाली. वधूचे हे रूप पाहून नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकांनी रात्रीच नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कुणाचे काही ऐकले नाही. 

रक्तबंबाळ झालेल्या वराला पाहून पोलीसही चकित
कुरारा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी शनिवारी सांगितले की, लग्नानंतर सासरी आलेल्या नववधूने वराला बेदम मारहाण केल्याची घटना पोलिस ठाण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि घटनेची चौकशी करून दोघांनाही समजावून सांगण्यात आले, परंतु कोणतीही बाजू मागे हटण्यास तयार नाही. वधू आणि वरांना घरगुती प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले. तेथून हे प्रकरण निकाली काढले जाईल.

Web Title: On the very first night of marriage, the wife beatan husband at Hamirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.