केतकीला कोणत्या आधारे अटक केली? केंद्रीय महिला आयोगाने राज्य पोलीस दलाकडे मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:50 PM2022-06-17T19:50:49+5:302022-06-17T19:51:39+5:30
Ketaki Chitale : अशा स्वरूपाच्या केसेसचा डेटा पोलिसांकडे आयोगाकडून मागण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ असा दावा केतकीने याचिकेद्वारे केला. तसेच केतकी चितळे प्रकरणात आज केंद्रीय महिला आयोगासमोर सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांना केतकीला कोणत्या आधारे अटक करण्यात आली, तिला अटक करताना नोटीस दिली होती असे प्रश्न आयोगाने उपस्थित केले. तसेच अशा स्वरूपाच्या केसेसचा डेटा पोलिसांकडे आयोगाकडून मागण्यात आला आहे.
केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगासमोर झालेल्या सुनावणीत राज्याच्या पोलीस महसंचालकांच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे आज हजर झाले. त्यावेळी केतकी चितळे प्रकरणात आयोगाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे 15 दिवसात महाराष्ट्र पोलिसांना द्यावी लागणार आहेत.
केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकीवर २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याआधीही तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तपासाला स्थगिती देण्याची मागणी तिने केली होती. मात्र, तिच्यावर अन्य गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. तिच्या आधीच्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.