चारचाकी वाहनाची काच फोडून नाशिकमध्ये दीड लाखांची रोकड लंपास

By नामदेव भोर | Published: September 30, 2022 07:39 PM2022-09-30T19:39:40+5:302022-09-30T19:40:21+5:30

दीड लाख रुपयांबरोबरच महत्त्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याची घटना

One and a half lakhs in cash looted in Nashik by breaking the glass of a four-wheeler | चारचाकी वाहनाची काच फोडून नाशिकमध्ये दीड लाखांची रोकड लंपास

चारचाकी वाहनाची काच फोडून नाशिकमध्ये दीड लाखांची रोकड लंपास

googlenewsNext

नामदेव भोर/नाशिक: दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमा गृहासमोर रस्त्यावर उभ्या केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने बॅगेत ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२८) घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर रोकड चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रोकड चोरी प्रकरणी नाशिकरोड जय भवानी रोड येथे राहणाऱ्या परीक्षित रसिकांत निकम यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निकम यांनी बुधवारी त्यांची कार क्रमांक (एमएच १५ एचएफ ६२०४: म्हसोबा मंदिर शेजारी दुभाजकाला लागून उभी केलेली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या उजव्या बाजूची मागील काच फोडून बॅगेत ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड तसेच महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले. या प्रकरणात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस टोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: One and a half lakhs in cash looted in Nashik by breaking the glass of a four-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.