सोशल मीडियाद्वारे त्रास देणारा जेरबंद, तरुणींना पाठवित होता अश्लील संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:18 AM2019-03-18T03:18:03+5:302019-03-18T03:18:17+5:30

पुण्यासह अन्य शहरातील तरुणींना फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे.

one arrest for sending obscene messages to young women | सोशल मीडियाद्वारे त्रास देणारा जेरबंद, तरुणींना पाठवित होता अश्लील संदेश

सोशल मीडियाद्वारे त्रास देणारा जेरबंद, तरुणींना पाठवित होता अश्लील संदेश

Next

न-हे  - पुण्यासह अन्य शहरातील तरुणींना फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रविकुमार पासवान (वय २९, सध्या : कोल्हापूर, मूळ बिहार) विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लील संदेश पाठवून आरोपी त्रास देत होता. फिर्यादीने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर स्वत:चे फोटो अपलोड केले होते, आरोपीने या तरुणीस फॉलो करून तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तरुणीच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील फोटो पाठवून पुणेरी कॉल गर्ल म्हणून तिचे नंबरही त्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते; तसेच तिला फोन करून त्याने १ लाख रुपयांची मागणीही केली असल्याची तक्रार या तरुणीने दिली.

रविकुमार पासवान हा तरुण गेल्या १३ वर्षांपासून पुण्यातील वारजे, पिंपरी आदी वेगवेगळ्या परिसरात राहत होता. एक महिन्यापूर्वीच तो कोल्हापुरातील एका कंपनीत सीएनसी आॅपरेटर म्हणून दरमहा १८ हजार पगारावर काम करण्यास गेला होता. आरोपीचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले असले, तरी तो फेसबुक व इन्स्टाग्राम अत्यंत कुशलतेने वापरत होता. त्याने आत्तापर्यंत ५० ते ६० तरुणी व महिलांना अशाप्रकारचे अश्लील संदेश पाठवले असल्याची कबुलीही दिली आहे.
या तरुणाबाबत अथवा अशाप्रकारच्या तरुणींना सोशल माध्यमातून अशाप्रकारचे संदेश आले असल्यास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केले
आहे.

रविकुमार हा तरुण २००७ पासून पुण्यात राहत होता, मात्र २०१८ साली त्याला तीन ते चार तरुणींनी सोशल मीडियाद्वारे संभाषण करीत सुमारे ४० ते ५० हजार रुपयांना गंडा घातला होता. तेव्हापासून मी सर्वच तरुणींना सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे संभाषण करीत असल्याचे सांगितले.

सोशल मीडीयातून विशेषत: तरुणी व महिलांना अशाप्रकारचे अश्लील संदेश पाठविण्याचे प्रकार वाढत असले, तरी तरुणींना घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार द्यावी.
- क्रांतीकुमार
पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे)
 

Web Title: one arrest for sending obscene messages to young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.