१ पिस्तूलसह दोन गावठी कट्टयासह एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 06:46 PM2019-03-29T18:46:03+5:302019-03-29T18:47:29+5:30
3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकी पूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूलसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले असून न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तिघांना अटक करून दोन पिस्टल व दोन गावठी कट्टा हस्तगत केले. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाण पूल परिसरात एक जण शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती, शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे याना दिली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाण पूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून साफळा लावला. गुरुवारी दुपारी अद्दीच वाजता एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्टलसह दोन गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळून आली. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले असून त्याचे नाव गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल (26) असे नाव आहे.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून न्यायालयाने त्याला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावणी आहे. गोविंद सिंग भदोरिया मूळचा मध्यप्रदेश मधील राहणार असलातरी, तो शहरातील शांतीनगर परिसरात राहतो. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी व्हीटीसी मैदान परीसरात मध्यरात्री अद्दीच वाजता मोटारसायकलवरून फिरणाऱ्याची दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक पिस्टल मिळाली. एकाच आठवड्यात तिघांना चार शस्त्रासह अटक केली असून याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. निवडणुकीपूर्वी काही घातपाताची तर शक्यता नव्हती याचा तपास पोलीस करत आहेत.